इंधन, खाद्यतेल, बी-बियाणे, खते दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केंद्र सरकारचा निषेध

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.17मे):- गेल्या एक दोन वर्षापासून सतत केंद्र सरकार पेट्रोल डिझेल बी-बियाणे खते, खाद्यतेल व गृह उपयोगी वस्तूच्या दिवसेंदिवस किमती वाढवित आहे.त्यामुळे आज दिनांक 17 मे 20 21रोज सोमवारला ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करीत ब्रह्मपुरीचे तहसीलदार विजय पवार यांच्या मार्फतीने निवेदन पंतप्रधान यांना पाठविण्यात येणार आहे.

गेल्या एक दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मे लोक हतबल झाले आहेत त्यातच लोकांच्या हाताला काम नाही शिवाय दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल खाद्यतेल बी-बियाणे खते यांच्या किमतीत दररोज वाढ होत असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक नागरिक हतबल झाले आहेत त्यामुळे शेतीविषयक उपयोगी वस्तू किमतीत वाढ झाल्याने सामान्य शेतकऱ्यांना शेती करणे सुद्धा परवडत नाही. आजच्या घडीला ट्रॅक्टर चे दर गगनाला भिडलेले आहेत गृह उपयोगी वस्तूमध्ये खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली
सामान्य माणसाचे आर्थिक बजेट बिघडले असून लौकडाऊन मध्ये केंद्र सरकार दोन हजार रुपये देतो आणि चार हजार रुपये वसूल करतो अशी परिस्थिती आहे तर कित्येक लोक कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी कर्जबाजारी झाला आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने सामान्य माणसांना परवडेल असेच दर ठेवून जीवनावश्यक वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मागणीही ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून पंतप्रधान यांना केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका काँग्रेस वासू सौदरकर, विधानसभा अध्यक्ष मोंटू पिलारे ठाकरे सरपंच मालडोंगरी उपसरपंच विनोद घोरमोडे, हरीभाऊ प्रधान, अतुल राऊत, जनता ठेंगरी ,ग्रामपंचायत सदस्य राजू पीलारे, विनोद दोनाडकर, छोटू धोंगडे, पटेल गणेश नवलाखे गिरीधर गुरुपुढे ,वैद्यनाथ बगमारे, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.