ऑल इंडिया पँथर सेनेचे केज तहसीलदार यांना निवेदन

327

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो:-880942185

केज(दि.21मे):-मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण हा अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी केज तहसीलदार यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या युवा केज तालुका अध्यक्ष आंजिके धिरे यांनी दिले निवेदन. मागासवर्गीयांचे पदोन्नतीत आरक्षण रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो कुणालातरी खुश करण्यासाठी खुनशी वृत्तीचं राजकारण आहे. जातीयेतेथून मागासवर्गीयांवर झालेला हा अत्याचार आहे.

आग विजवायची सोडून तेल टाकण्याचा हा पराक्रम आहे. तात्काळ निर्णय रद्द करा. अन्यथा ऑल इंडिया पॅंथर सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शासन दर वेळेस जर असे पाऊल उचलत जात असेल तर हे निंदनीय मनुवादी धोरण आहे. सरकारने हे केलेले कृत्य जातीयवादी आहे हे सर्व मागासवर्गीयांचे आरोप आहेत. असा निर्णय घेणे म्हणजे सामाजिक दंगली घडण्यास खत पाणी घालने आहे .

ऑल इंडिया पॅंथर सेना या जातीवादी सरकारचा निषेध करत व या निर्णयाचा विरोध करत ऑल इंडिया पॅंथर सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असे आव्हान सरकारला व प्रशासनाला करत आहोत. मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द हा निर्णय तातडीने व तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा ऑल इंडिया पेंटर सेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे युवा केज तालुका अध्यक्ष अजिंक्य धीरे यांनी दिला आहे.