चिंधीचक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थान नुतनीकरणाचे लोकार्पण संपन्न

29

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.21मे):- तालुक्यातील तळोधी (बा.) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या चिंधीचक येथील उपकेंद्रातील निवासस्थान इमारत नुतनीकरणाचे लोकार्पण या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते पार पडले.
चिंधीचक या आदिवासीबहुल गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील असलेले निवासस्थान राहण्याजोगे नसल्याने व गावातही किरायाने घर मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुक्कामी राहु शकत नव्हते. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचारासाठी धावपळ करावी लागत होती.

ही अडचण स्थानिक वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या निदर्शनास आणून दिली.याची दखल घेत जि.प.आरोग्य विभागाच्या जिल्हा निधीतून निवासस्थान इमारतीच्या दुरुस्ती व नुतनीकरणाचे प्रस्ताव तयार करून मंजुरी घेत त्वरीत काम पुर्णत्वास नेले.या नुतनीकरणामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

व जनतेच्या अडीअडचणी सोडविणारे पारडी – मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांचे आभार मानले आहे . या लोकार्पण प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी , चिंधीचक चे सरपंच रविंद्र गायकवाड , उपसरपंच प्रदिप समर्थ , वैद्यकीय अधिकारी डॅा. जयदीप राठोड व डॉ. कांचन कोडापे मँडम , भाजपाचे तालुका महामंत्री जगदीश सडमाके , माजी उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य हरीजी वरठे , ग्रा.पं.सदस्या सौ.विश्रांती सातपैसे , चिंधीचक चे ग्रामसेवक रतन वासे , माजी ग्रा.पं.सदस्य ह.भ.प.रतनजी जांभुळे महाराज , बचतगटाच्या व प्रगतीशील शेतकरी सौ.वर्षाताई लांजेवार , परीचारिका सैय्यद मँडम , आशावर्कर , आरोग्य कर्मचारी , ग्रामपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते.
====================