केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात प्रहार दिव्यांग संघटना कुंटूरच्या वतीने ताली व थाली वाजवून केला निषेध

42

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.21मे):- प्रहार दिव्यांग संघटना नांदेड शाखा कुंटूरच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेध व्यक्त करण्याच्या उद्देशाने काल हनुमान मंदिर चौक कुंटूर येथे केंद्र सरकारने जाहीर केलेले रासायनिक खतांचे भाव तातडीने कमी करण्यात यावे, तसेच तुर, उडीद,मुग या कडधान्यांची आयात थांबवावी. या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटना नांदेड शाखा कुंटूर च्या वतीने दिव्यांगांचे दैवत व शेतकऱ्यांचे कैवारी मा.राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व विठ्ठलराव देशमुख, पंढरीनाथ हुंडेकर यांच्या सहकार्याने ताली व थाली बजाव आंदोलन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ताली व थाली वाजवल्याने कोरोना पळून जातो,तर ताली आणि थाली वाजवून रासायनिक खतांचीअन्याय कारक केलेली दरवाढ व आवश्यकता नसतांना होत असलेली कडधान्यांची आयात का कमी होणार नाही ? सरकारच्या या जाचक अटी विरोधात नांदेड जिल्ह्यातील प्रतेक तालुक्यात व प्रत्येक गावागावात प्रहारच्या सैनिकांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन केंद्र सरकारचा निषेध केला.

या आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेचे नांदेड जिल्हा सहसचिव चांदू आंबटवाड, कुंटूरचे प्रहार शाखा प्रमुख जावेद चाऊस, मल्हारी महादाळे, वामनराव पा.चिंताके, नरेश मामीडवार, गणेश महाराज कदम,तेजेराव पा.पिंपळे, कुंटूर चे प्रसिद्ध कवी बाळू दुगडूमवार,शिवाजी आडकिणे,पमू पा.शिनगारे व ईतर शेतकरी बांधव हजर होते..