शहरी व ग्रामीण भागातील लसी करणाच्या वेग वाढवा- डाॅ उमेश वावरे

58

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.21मे):-आज देशा मधे कोविड-19 मुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत आहेरुग्णालयातील वैद्यकीय सुविधाचा अभाव असून सर्वत्र वेंटीलेटर बेड तसेच ऑक्सीजनची कमतरता आहे. आज युरोपियन देशात संपूर्ण लसीकरण झाल्यामुळे हे देश कोरोणा मुक्त होण्याचा मार्गावर आहे. परंतु महाराष्ट्र मध्ये लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे आज ही आपण कोरोनाच्या छायेतच जगत आहोत.

म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व विकासकामे तसेच इतर वित्तीय खर्च बंद करून लस खरेदीला प्राधान्य द्यावे. प्रत्येक खेडे गावात व शहरी वार्ड मध्ये लसिकरणाची जोरदार मोहीम राबवुन कोविड 19 खातमा केला पाहीजे अश्या आशयाचे निवेदन वंचित बहूजन आघाडीचे नेते डाॅ उमेश वावरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी खंडाइत यांचे मार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आले.याप्रसंगी मनीष कांबळे, दिलिप कहूरके, राजेश खानकूरे, जिवन उरकुडे, मायासिग टाक, चारू आटे, विनोद गोडघाटे उपस्थित होते.