शेकापूर ते वेणी पुलाचे काम ठरलेय मरनघाट -शेतकऱ्यांना शेतात जाणे झाले कठीण

26

✒️सचिन महाजन(प्रतिनिधी हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.23मे):-तालुक्यातील वेणी ते शेकापूर पुलाच काम कधी होणार अशी आर्त हाक देऊन त्रस्त झाले आहेत, पावसाळा जवळ आला तरी त्या पुलाच काम पूर्ण नाही. हायवे नंबर 7 ला लागून असेल गाव पोहना, वेणी, शेकापूर, माढेळी हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खत ,कापूस , सोयाबीन, तूर आदी शेतमाल घरी नेण्यासाठी साठी पर्यायच नाही. शेतकरी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून बैल बंडी काढावी लागते , पूर आला की रस्ता बंद असते. सतत पाण्याची धार आल्यामुळे त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागतो.

शेकापूर-वेणी पुलाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अधिकारी -कर्मचारी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा पुलाची तक्रार सुद्धा केली, पण प्रशासन लक्ष देत नाही , पंचवीस वर्षापासून ही समस्या कायम आहे. पुलाचे काम सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला तर शेतकरी शांत बसतील अन्यथा आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे मत शेतकरी-शेतमजूर यांनी व्यक्त केले.