मारवाड़ी महिला मंडळाच्या संकल्पनेतून बहु-बेटी मिलन संमेलन

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)मो:-7387878769

यवतमाळ(दि.23मे):-मागील वर्षापासून सणासुदीच्या काळामध्ये या ना त्या निमित्ताने सुख-दुःखाच्या निमित्ताने वाढदिवस लग्न व इतर संमेलनाच्या आयोजनातून अनेक कुटुंब, मित्र मंडळ व दुरवरच्या नातेवाईकांची भेट होणे शक्य व्हायचे त्यामुळे एकमेकांचे सुखदुःख आप्तस्वकीयांच्या भेटीचा तो परमानंद, सुखाचा अनुभव सोबतच नवीन नातेसंबंध तयार होणे, असलेले नातेसंबंधांमध्ये गाढ होणे, एकमेकांप्रती आत्मीयता, आदरभाव वाढीस लागण्यास मदत व्हायची परंतु या कोरोना काळाने अगदी मृत्यूच्या समयी सुद्धा नातलगांना येण्यास मनाई आहे. त्यामुळे एक-दोन, चार-चौघात आनंद- दुःखाला सामोरे जाण्याची वेळ सर्वांवरच येऊन ठेपली आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात कौटुंबिक व सामाजिक दुरी सुद्धा निर्माण झाली आहे. हे नुकसान अशा कोरोणाच्या वाढत्या संकटामुळे वाढत राहिल्यास दुस-या एका महाभयंकर नुकसानीचा सामना करावा लागण्याची भीती नाकारता येत नाही वतेच संभाव्य सामाजिक व कौटुंबिक आघात रोखण्यासाठी मारवाड़ी महिला मंडळाच्या संकल्पनेतून बहु-बेटी मिलन संमेलनाचे आयोजन 20 मे 2021 पासून 23 मे 2021 पर्यंत व्हाट्सअप ग्रुप द्वारे होणाऱ्या आयोजनातून अनेक दिवसांपासून दुरावलेल्या संबंधाला, दुरावलेल्या नात्याला जवळ आणण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.

आपल्या पुसद शहरातील मुली बाहेर जावे सासरी गेले असल्याने तसेच बाहेर गावावरून आपल्या गावी आलेल्या सुनांना माहेरी जाणे आपल्या नातलगांना भेटणे या कोरोना संकटामुळे अशक्य झाल्याने ते शक्य करण्यासाठी सामाजिक अंतर पळून सामाजिक व कौटुंबिक जवळीकता साधण्यासाठी, नाते संबंध दृढ करण्यासाठी राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने आयोजित बहु-बेटी संमेलनाला मोठ्या प्रमाणात यश येत आहे. यासाठी महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ माधुरी मुंदडा यांनी प्रथमता ही संकल्पना आपल्या राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ बेबी जांगिड़ व इतर सदस्यांसमोर मांडली आणि त्याबाबत विचार विनिमयातून संकल्पना राबविण्यासाठी तयारी सुरू झाली आणि त्यानूसार व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात आले.

पुसद शहरातील मारवाडी समाजातील कोणत्या मुली बाहेर गावी गेल्या आहेत व कोणत्या सुना आपल्या गावात आहे याची यादी तयार करून ग्रुप बनविण्यात आला आणि त्याची सुरुवात मनात चार दिवसीय या बहूपयोगी संमेलनाच्या आयोजनात संपूर्ण देशाला कौटुंबिक व सामाजिक अंतर कमी करण्यात या संकल्पनेला प्रथमच पुसद पासुन सुरुवात होत आहे. राजस्थानी महिला मंडल चे अध्यक्ष बेबी जांगिड़, सचिव नंदा तोषनीवाल, प्रकल्प प्रमुख माधुरी मूंदड़ा, सह प्रमुख प्रीति गट्टानी, अनीता सारडा, नीलू जांगिड़ या आयोजकांना ही संकल्पना साकारण्यासाठी यश मिळो ह्याच शुभेच्छा