विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या- धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील धक्कादायक घटना

30

” मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा तरुण भावेश चव्हाण याची आत्महत्या. भावेशच्या कुटुंबीयांना व मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- जयदिप लौखे-मराठे

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.23मे):- तालुक्यातील बोरकुंड येथील भावेश दिलीप चव्हाण या विद्यार्थी तरुणांने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. तो शनिवारी सायंकाळपासून घरातून निघून गेला होता. त्याचा शोध सुरु असताना तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील शेतकरी आहेत.

त्याला तीन बहिणी असून पैकी दोघींचे लग्न झाले आहे. तो अतिशय हुशार होता. बीएस्सीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. दरम्यान मराठा समाजासाठी असलेले शैक्षणिक आरक्षण त्याला न मिळाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. तर, त्याला न्याय मिळवून देणार, अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शंभुसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष तथा सकल मराठा समाजाचे युवानेते जयदिप लौखे-मराठे यांनी केली आहे.