ट्रान्सफॉर्मर जळाल्याने लहान बालका सोबत वृद्धांचे हाल

32

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.25मे):-मागील दहा दिवसापासून मातंगवस्ती मधील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तेथील नागरिकांचे हाल होत आहेत, लहान बालके,वयोवृद्ध यांच्या सह सर्वांचे हाल होत आहे याकडे विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तेथील डीपी लवकरात लवकर बसवून समस्यां दूर करावी अशी मागणी तेथील नागरिकांकडून होत आहे.

सद्या उन्हाळा सुरू असून वातावरण बदल होत आहे,सकाळपासून कडक उन्हाचा पारा वाढत असल्याने लोकांना त्रास होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व नागरिक घरीच असतात त्यात लाईट नाही त्यामुळे घरात बसने मुश्कील होत आहे.दिवसा कसाही वेळ निघून जातो परंतु रात्रीच्या वेळी वातावरण बदला मुळे बाहेर बसने कठीण असल्याने आणि घरात लाईट नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

लहान बालके आणि वयोवृद्ध यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून याठिकानचा ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवण्यात यावा अशी मागणी तेथील नागरिकांकडून करण्यात येत आहे, या ट्रान्सफॉर्मर खाली शिंदे गल्ली,मातंगवस्ती ,चांभारवाडा, ढोरवाडा ,हात्ते गल्ली याठिकाच्या भागाचा समावेश होत असून सद्याच्या वातावरणाच्या व वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी याठिकानचा डीपी तात्काळ बसवून समस्यां दूर करावी अशी मागणी होत आहे.