लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर ला आम. श्र्वेताताई महाले- पाटील यांची भेट

103

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.25मे):-मौजे केळवद येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटर च्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबई येथे महत्वाची मिटींग असल्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. आमच्या पंचायत समिती सभापती सौ सिंधुताई तायडे यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या आयसोलेशन सेंटरला आज भेट दिली तसेच गावकऱ्यांशी चर्चा केली. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. काल राज्यात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ६०% रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

केळवद ग्रामस्थांनी लोकसहभागातून 10 बेड चे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू केले असून या सेंटरला लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी श्री पंडितराव देशमुख शहराध्यक्ष भाजप, सौ द्वारकामाई भोसले तालुका अध्यक्ष महिला मोर्चा भाजप, सरपंच नर्मदाबाई गवई ,उपसरपंच कडूबा पाटिल , श्री गणेश यंगड, श्री अशोक मोहिते, श्री संजय पाटील, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.