अकोले पोलीस स्टेशन चा नवीन फंडा वेलकम टू कोरोना टेस्ट

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

अकोले(दि.27मे):-नागरिकांना सांगून देखील ऐकण्याची मनस्थिती नसल्यामुळे प्रशासन वारंवार आदेशाचे जीआर काढले जातात तर दमबाजी करून नागरिकांना घरी बसविण्याचे आदेश असले तरी जनता कोणत्या परिस्थितीत ऐकत नाही मार दिला तर पुन्हा पोलीस यंत्रणेवर ताशेरे ओढणे साठी नेते कार्यकर्ते पुढे पुढे येतात त्यामध्ये दुश्मनी कोणा कोणा बरोबर घ्यायची दिवसभर सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या ना जरा रात्रीच्या वेळी घरी गेल्यानंतर कुटुंबातील लोक दिवसभर तुम्ही अनेक लोकांबरोबर तुमचा संपर्क आल्यामुळे तुम्ही बाहेरच थांबा एकीकडे जनतेचा त्रास तर दुसरीकडे घरात देखील परिवाराकडून त्रास होत असल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून अकोले,राजूर पोलिस अधिकारी मिथुन घुगे,नरेंद्र साबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरातील रस्ते बंद करत मुख्य कोल्हार घोटी रस्ता,महात्मा फुले चौकात कोणी आले.

तरी ,वेलकम टू कोरोना ,टेस्ट हा नवा फंडा सुरू करून ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येईल त्यांना थेट कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्याचे कार्य सध्या पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे कोणालाही मारहाण नको कुणाबरोबर दुश्मनी नको कोणत्याही नेत्याचे आपणाला गाडी आल्यानंतर फोन पण नको कोणी पण या आपली टेस्ट करून घ्या पॉझिटीव्ह आल्यानंतर थेट कोव्हीड सेंटरला दाखवा असा समजुतीचा सल्ला सध्या पोलीस मित्रांकडून पाहावयास मिळतो.

ऐकावे ते नवलच घडतंय महसूल पोलीस आरोग्य विभाग जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी परिश्रम घेत आहे. मात्र लोक ऐकत नाही .आज राजूर भाजीपाला मार्केट मध्ये वेळ उलटूनही विक्रेते ऐकत नसल्याने पन्नास विक्रेत्यांची टेस्ट करण्यात आली . सपो नि नरेंद्र साबळे,हेड कॉन्स्टेबल नेहे यांनी रांगेत उभे करून टेस्ट करण्यास भाग पाडले .त्यात मास्क न वापरणारे,मोटरसायकलवर टीबल सीट,सामाजिक अंतर न पाळणारे सर्वच व्यक्तीवर कारवाई केली .पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे .