कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आमदार श्र्वेताताई महाले यांच्याहस्ते प्रमाणपञ वितरित

42

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.27मे):- श्री नितीनजी गडकरी
यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना किराणा किट्स, चादर आणि टॉवेल वितरित केले तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

कोरोना महामारीत मागच्या वर्षीपासून डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आदी जण आघाडीवर राहून लढत आहेत. त्यांच्यासोबतच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन करणारे, मृत शरीर हेल्थ प्रोटोकॉलनुसार अंत्यविधीसाठी पाठवणारे कर्मचारी पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. आज आमचे नेते मा ना श्री नितीनजी गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असे कर्मचारी श्री प्रशांत चौधरी, श्री सतीश काळे, श्री दीपक राजूरकर, श्री रवी बोरकर, श्री मनीष हाडे, श्री लखन मोरे, श्री गजानन केवट आदींना किराणा किट्स, चादर आणि टॉवेल वितरित केले तसेच ते सर्वजण निस्वार्थीपणे बजावत असलेल्या कर्तव्यासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केले.

यावेळी मा ऍड विजयजी कोठारी प्रदेश कार्यकारणी सदस्य , मा श्री सुहासजी शेटे माजी नगराध्यक्ष ,मा श्री सुरेंद्रजी पांडे जिल्हा कार्यकारणी सदस्य, मा श्री पंडितदादा देशमुख शहराध्यक्ष, मा श्री कुणाल बोन्द्रे, मा श्री डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप, मा श्री विजयजी नकवाल सभापती आरोग्य नगर परिषद, मा श्री गोविंद देव्हडे नगरसेवक, मा श्री संजय आतार नगरसेवक, मा श्री सुभाषअप्पा झगडे, मा श्री सुनील वायाळ, मा श्री संतोष काळे पाटिल तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, मा श्री विजय खरे, श्री युवराज भुसारी , श्री नरेंद्र मोरवाल , श्री महेश लोणकर, श्री सचिन कोकाटे, श्री नचिकेत पांडे, श्री सागर पुरोहित, श्री सुदीप भालेराव, श्री अनिल सपकाळ व इतर उपस्थित होते.