प्रशासनाला बालविवाह रोखण्यात आले यश

36

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतीनीधी)
मो. 9763463407

घाटनांदूर(दि.27मे):-साळुंखवाडी (ता. अंबाजोगाई) येथील अल्पवयीन बालिकेचा होणारा बालविवाह मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी कारवाई करून तूर्त रोखण्यात यश आले आहे.
साळुंकवाडी येथील शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीचा वैतागवाडी (ता.सोनपेठ) येथील मुलाशी (ता.३०) रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती एका मेलद्वारे महिला व बालकल्याण जिल्हाधिकारी व्ही एम हुंडेकर यांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी अंबाजोगाई येथील एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ए डी क्षीरसागर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले.

संशयित ठिकाणी भेट दिली असता बालिका ही अल्पवयीन असल्याचे दिसून आले. परंतू सदर ठिकाणी विवाह होत असल्याबाबत काही एक दिसून येत नव्हते तरी हि मुलींच्या आई वडील यांच्या कडून बाल विवाह प्रतिबंधक कायदानुसार जबाब नोंदवून घेतले.अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार नाही या बाबत सूचना देण्यात आल्या, तसेच बर्दापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एल.शिंदे यांनी पालकांकडून जबाब लिहून घेऊन पालकांना समज दिली. तसेच जर मुलीचा विवाह ,१८वर्षे पूर्ण होण्या आधीच केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.तसेच अल्पवयीन बालिकेला बालकल्याण समिती समोर उपस्थित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी सरपंच तथा ग्राम बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा विद्या माले उपसरपंच संजिवनी बेलदार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका ए.डी. क्षिरसागर , बर्दापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.एल.शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल पी आर जाधव, एस डी चेवले, पोलीस पाटील इंद्रशेखर कर्वे , बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी बी एच मेंगले , बाल संरक्षण समितीचे पदाधिकारी बालासाहेब जगदाळे , जालिंदर कसाब, सुनंदा यादव महानंदा माले , जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाजीराव ढाकणे , अंबाजोगाई चे तालुका संरक्षण अधिकारी संतोष वैष्णव तसेच इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर बालविवाह प्रकरणात अंगणवाडी पर्यवेक्षिका ए. डी. क्षिरसागर यांनी आई वडील यांना मार्गदर्शन केले व समज देण्यात आली.सदर अधिकारी व कर्मचारी संशयित बालविवाह थांबवण्यात यशस्वी झाले.