खुराड्यातील कोंबड्यांनी वाघाला ललकारु नये, निलेश राणे औकातीत बोला- छावा प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे

32

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.27मे):- संबंध जगाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती घराण्याची परंपरा पुढे चालवत येथील बहुजनांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहेत.हे सर्व करत असतेवेळी काही नेत्यांना बघवत नाही. यापैकीच एक निलेश राणे यांनी संभाजीराजेवर घणाघात केल्यानंतर निलेश राणेवर छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे हे आक्रमक झाले असुन त्यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर सुद्धा दिले छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा चालू केला दौर्‍यात अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा गेले.

त्यात, राजकीय नेत्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची मराठा समन्वयक यांची बाजू जाणून घेऊन मराठा आरक्षणासाठी अतितटीने प्रयत्न करत आहेत.याच दौऱ्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली शरद पवारांच्या भेटीनंतर निलेश राणे सारखे खराड्यातले कोंबडे जागे झाले निलेश राणे म्हणतात संभाजी महाराजांना ठेका दिलेला नाही निलेश राणे यांनी अवकातीत बोलावं बहुजन समाजाने छत्रपती संभाजी महाराजांना ठेका दिला नसून जबाबदारी दिली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजचा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापर्यंत छत्रपती परिवाराने ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.

राणे तुमच्यासारख्या कुत्र्याने भुंकला म्हणून समाज तुमच्या बाजूने येणार नाही मराठा समाज का नाही छत्रपती संभाजी महाराजांसोबत होता आणि आजही छत्रपती संभाजी महाराजां सोबतच आहे आणि उद्या ही छत्रपती संभाजी महाराजां सोबतच मराठा समाज राहील.ह्या छत्रपती संभाजी महाराजांनी 2014ला आझाद मैदानावर तुमच्या वडिलांना वाचवलं होतं हे विसरू नका आणि आपण स्वतः संसदेत किती झक मारली हे सुद्धा पाहा.
यापुढे संभाजीराजेविरुद्ध बोलण्या अगोदर दहा वेळा विचार करा अन्यथा महाराष्ट्रात फिरणे बंद करु अशी सक्त ताकद सुद्धा यावेळी छावा युवा संघटनेचे विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी दिली