बुध्द पौर्णिमे निमित्ताने रुग्णांना भोजन

32

🔸उपासक सुधाकर लोमटे व उपासिका कल्पना सुधाकर लोमटे यांच्या २१ लग्नाच्या वाढदिवसा निमित्त केले अन्नदान

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

उमरखेड(दि.27मे):- येथील सरकारी दवाखान्यामध्ये *कल्पना सुधाकर लोमटे यांनी सद्याची कोविडची परिस्थिती या परिस्थितीमधे आपलेही ईतरांसाठी काहीतरी योगदान असलं पाहीजे व ते केले सुद्धा पाहिजे हे जाणुन यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित् कोव्हिड रुग्णासांठी, ईतर रुग्ण यासाठी बुध्द पौर्णिमैचे औचित्य साधुन या पविञ दिवशी १०० रुग्ण व्यक्तीचे भोजन देऊन लग्नाचा वाढदीवस साजरा केला.*भोजन देऊन या पुण्यकर्मात सहभागी झाले.

*आदर्श संस्था* उमरखेड अंतर्गत चालु असलेल्या “कोव्हीड अन्नपाणी मदत मोहीम” या उपक्रमाच्या माध्यमातुन उमरखेड परिसरातील चालु असलेल्या, रुग्णालयात तपासनीसाठी आलेल्या,रुग्णं,कोव्हीड रुग्ण,मनोरुग्ण ,रुग्णांच्या नातेवाईकांना आजचे भोजन देऊन सहभागी झालेत.आपणही या सत्कार्यात अन्नदानासाठी आर्थीक सहकार्य करुन सहभागी होऊ शकता.

यावेळी सौ. कल्पना सुधाकर लोमटे संस्थेचे कार्यकर्ते सचिन लामटीळे, मारोती इंगोले, दामोधर इंगोले, मधुकर राठोड, शेवंतराव गायकवाड आदी हजर होते.