“समाज कारण करा राजकारण नको”

34

आज काल समाजात जळणाऱ्यांची सख्या दुप्पटीने वाढत जात आहे. खरे आहे ना ? क्षेत्र कुठलंही असो त्यात एक माणूस असा असतो , जो नेहमी दुसऱ्यावर टीका कराणारा असतोच. स्वत:चे वर्चस्व कायम कसे ठेवावे या कडे आज काल समाजातील माणसाची वृत्ती बदलत जात असतांना दिसत आहे.
एेखाद्याला एेखांद पद मिळाले किंवा मोठे पणा दिला म्हणजे तो स्वत:ला ‘शेर’ समजून बसतो. जणू काही भारताची सत्ता तोच चालवत आहे. समाजाचा दृष्टीकोन बदलायला हवा. लोक आपल्याला भुरळ घालतात आणि आपण त्यांच्या मणाप्रमाणे वागतो त्या वेळी नुसकान हे आपले निश्चीत असते.

समाजात मध्ये तुम्ही चांगले कार्य करत असाल तर , तुमच्यावर टीका करणारे भरपुर लोक तुम्हाला दिसतात. कारण त्यांना काही चांगल्या गोष्टी खपवत नाहीत. म्हणजे स्वत:ही काही करत नाहीत आणि दुसऱ्याला पण काही करु देत नाही. आज काल माणसाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न समाजातील लोक करत आहेत. तुम्ही हे करु नका , ते करु नका असे सांगणारे अनेक व्यक्ती तुम्हाला दिसत असणारच. पण माणसाने स्वत:च्या मनाला काय योग्य व अयोग्य आहे या कडे लक्ष द्यायला हवे. टीका टिपण्या करणारे लोक स्वत: चांगल्या गोष्टी करु शकत नाहीत किंवा एेखांद्याला आनंद देऊ शकत नाही तेव्हा ते दुसऱ्याचे पाय कसे खेचावे , आणि समाजाला त्या व्यक्ती पासून दुर कसे ठेवावे, या गोष्टीत आज काल समाजातील माणूस माहीर झाला आहे. मित्रानों माणूस स्वतंत्र आहे आणि त्यास पूर्ण हक्क आहे आपणे काय करावे किंवा काय नाही करावे. कोणी कोणाचे बांधलेलं नाही.

समाजाला आता जागृत व्हायला हवे. स्वत:ची प्रसिद्धी होण्यासाठी लोक काहीही करु शकतात आणि कोणावरही टिका टिपणी करतात. याचे कारण म्हणजे ‘अहंकार’ होय. मिळालेली प्रसिद्धी ही जन्मभर टिकणारी नसते तर केव्हा काय होईल सांगता येत नसते. तुम्ही कोणावर टिका करण्याता हक्क तुम्हाला कोणी दिलाय ? आणि यातून साध्य काय होणार आहे? अशा कारणाने समाज हरवत जात आहे. एेखांद्यावर टिका केल्याणे तुम्हाला समाजात चांगला व्यक्ती सापडणार नाही , तर चांगला असलेला व्यक्ती सुद्धा हरवणार आहे.

कार्य असे करा की ज्यामुळे आपल्याला लोक ओळखतील , आपल्याला नेहमी आठवणीत ठेवतील. लोकांच्या मनात आनंद निर्माण करू शकत नाही तर , निदान त्यांना दु:खी तरी करू नका. लक्षात ठेवा “अहंकाराचे घर नेहमी रिकामे असते”. तुम्ही करताय ते योग्य आणि बाकीचे करतात ते अयोग्य कसे असेल ? लाज वाटू द्या जरा आपण कोणावर काही पण टिका करायची म्हणजे तुमचा काय हा जन्मसिद्ध अधिकार आहे का ? चार पुस्तक वाचल्याने तुम्ही स्वत:ला खुप महान समजून बसतातय का ? सर्व आपआपल्या जागेवर योग्य असतात , जसे तुम्ही तसेच आम्ही. फक्त फरक येवढाच की इतरांना त्या गोष्टीतून मिळालेला आनंद तुमच्या दृष्टीला खपवत नाहीत.
“जशी दृष्टी , तशी सृष्टी” नजर चांगली असेल तर सर्व गोष्टी चांगल्याच दिसतील. फक्त तशी नजर आपल्याकडे असायला हवी. कोणाच्या घरात डोकावून बघायचे कारण काय तुम्हाला ? कोण काय करतय किंवा कोण कसं जगतय या कडे लक्ष कमी द्या , आणि समाज घडण्याचे सामर्थ मनात ठेवा.

टिका टिपण्या करायाच्याच असेल तर वाईट गोष्टीवर करा , स्वत:चे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी करु नका. तुमच्या नजरेला एेखांद्याचे पद खपवत नसेल तर त्या कडे दुर्लक्ष करा. जे जवळ आहे त्यातं आनंद मिळवा. म्हणतात ना “कण भर सुखात मन भर जगता आले तेचं जीवन आहे” असे काही तरी करा. लोकांच्याकडे देणे सोडून द्या. अशा कारणास्त आपल्यावर सुध्दा टिका होत असतात. समाज घडवा पण् चांगल्या वृत्तीने घडवा , मनातच पाप असेल तर मंदीरात जाऊन अर्थ नाही. लक्षात ठेवा , तुमच्या अशा टिका टिपणी मुळे अनेक माणस तुटतील आणि एक दिवस तुम्ही स्वत:ला त्या बद्दल कोसळणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल. वेळ निघून जाण्याआधी आपण जाग्यावर या. लोकांच्या काड्या करणे बंद करा , नाहीतर तुमच्यात लाकडं तयार होतील. कोण काय करते , कोण कसं वागते , कोण कुठे आहे , कुठे काय चालतंय या कडे लक्ष कमी द्या. यात आपलाचं फायदा असतो. डोक्याला ताण मिळत नाही आणि रात्रीची झोपही शांत लागते. आणि समाज पण तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखते. “समाजकारण करा राजकारण नको!”

“एक पाऊल , समाज घडवण्याकडे”

शब्दशृंगार , तू फक्त माझीच
अखिल भारतीय मराठी साहित्य परीषद

✒️अमरावती,विभागीय अध्यक्ष(विशाल पाटील वेरुळकर)