सदाशिव बेलाप्पा शेटे यांचे दुःखद निधन

49

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.29मे):- तालुक्यातील दिंद्रुडचे भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा देणारे श्री ओमप्रकाश शेटे, आयुष मंत्रालय भारत सरकारचे तज्ञ संचालक डाॅ शिवरत्न शेटे, अॅड किर्तीकुमार शेटे या कर्तृत्ववान मुलांचे जन्मदाते सदाशिवआण्णा शेटे मागील काही दिवसांपासून लिव्हरच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्यास यश आले नाही.दि,२८रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

आण्णा हे हुरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. बालपणीच त्यांचे वडिलांचे छत्र हरवले होते. मात्र परिस्थितीशी संघर्ष करत व्यापारात त्यांनी नावलौकिक मिळवला. किराणा, ट्रेडर्स, बीज भांडार, सराफा व्यवसायात त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. प्रचंड हजरजवाबीपणा हा त्यांचा स्थायी भाव.व्यावसायिक क्षेत्रासोबतच कलेची आवड असलेल्या शेटे यांनी वयाच्या ६० व्या वर्षांत त्यांनी अनेक मालिकांत भुमीका निभावल्या. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह हा तरुणांना लाजवेल असा होता. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.