भारतीय जनता पार्टीचे नेते बालाजी बच्चेवार साहेब यांचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा

33

🔸सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ यांनी दिल्या शुभेच्छा

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगांव(दि.29मे):- देशावर सध्या कोरोनाचे संकट असल्याने देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितींनजी गडकरी साहेब यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे तथा नायगांव विधानसभेचे लोकप्रिय नेते माजी जिल्हा परिषद सदस्य मा. बालाजी बच्चेवार साहेब यांचा वाढदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी प्रमाणे साजरा न करता सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या संपर्क कार्यालयात अंत्यत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

त्यांच्या जन्म दिनानिमत्त शिवानंद पांचाळ , तसेच फुलारी समाजाचे युवा कार्यकर्ते गजानन सुरेशराव फुलारी परिट समाज संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष बाळू दादा ईबितवार यांनी त्यांना उंदड आयुष्य उत्तम आरोग्य यश लाभो अश्या पांचाळ परिवार ,फुलारी परिवार, ईबितवार परिवार तसेच मित्रमंडळाच्या वतिने शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवाजी पाटील वडजे, शंकर दादा वडपत्रे, अदी पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित होते,