पहुरजीरा येथे अचानक आलेल्या वादळा व पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्थाना तत्काळ पंचनामे करून मदत करा-पवन चव्हाण

28

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.29मे):-दि.28.5.2021 रोजी पहुरजीरा येथे तापत्या उन्हात अचानक दमदार पावसासह व वादळासह वातावरण खराब झाले. पहुरजीरा येथील शेतकरी गरीब मजूर प्रत्येक लोकांचे काहींना काही नुकसान झाले आहेत.जास्तीत जास्त लोकांच्या घरात पाणी शिरले असून पत्रे उडून गेले आहेत अश्या परिस्थितीत गरीब लोकांचं काय असा प्रश्न गावकरी जनतेच्या समोर उपस्थित झाला आहे.

अगोदरच कोरोना सारख्या महामारीत सर्व लोकांचे काम धंदे बंद असून आता स्वतःच्या घर ला खर्च लावणे शक्य होत नाही आहे.त्यामुळे गोवेरमेंट नी लवकरात लवकर लक्ष देत गरिबांना मदत करावी जेणेकरून येणाऱ्या पावसाळ्यात अश्या परिस्थिती जनतेला सामना करण्यास मदत होईल. अशी मागणी पहुरजीरा येथील रहिवासी पवन चव्हाण व गावातील नुकसान ग्रास्थांनी केली.