पीडीत कुटुंबाला पोलिस संरक्षण ध्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार.-प्रमोद कुलदीपके

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

हिंगोली(दि.29मे):-वसमत तालुक्यातील गिरगाव या ठिकाणी दि,२१ रोजी काही जातीवादी नराधमांनी मागासवर्गीय महिला सारिका संजय सूर्यतळ यांच्यावर हल्ला केला .सूर्यतळ ह्या अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असताना त्यांना नोकरीवरून काढून टाकेल अशा हुकूमशाही पद्धतीने धमक्या देत 4 वर्षे शारीरिक संबंध ठेऊन अन्याय करण्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांच्या घरी समजावून सांगण्याकरता गेले असता त्यांना दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि अंगावरचे सर्व दागिने काढून गावच्या चौकात धक्काबुक्की करत बेअब्रू करण्यात आले. 25 /4 /2021 रोजी कुरुंदा पोलीस स्टेशन मध्ये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

ऐक आरोपी अटक परंतु प्रस्थापितांच्या सांगण्यावरून एक आरोपी उर्वरित मोकाट फिरत असलेला दिसून येत आहे. वारंवार पिडीत कुटुंबाला धमक्या येत आहेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा काम करू नये त्या करिता भीम शक्ती मागण्या करीत आहे.1. उर्वरित एका आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी 2. पीडित कुटुंबावर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याने पीडित कुटुंबाला ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 15 ( अ) नुसार सशस्त्र पोलिस संरक्षण देण्यात यावी.3. सदरील गुन्ह्याचा तपास 60 दिवसात पूर्ण करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात यावी.4. सदरील गुन्ह्याचा तपास व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये करण्यात यावा. अशा अनेक मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वसमत यांना देण्यात आला अन्यथा भीमशक्ती च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी दिला आहे.