शासनाच्या गलथान कारभारामुळे संस्थाप्रमुखावरच आली आमरण उपोषणाला बसण्याची वेळ

27

🔹आज उपोषणाचा सातवा दिवस

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.29मे):- तालुक्यातील पाथरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर (अनुजाती) माध्यमिक शिक्षण आश्रम शाळा पाथरा तालुका केज जिल्हा बीड येथील लहु बनसोडे (संस्थाप्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ पाथरा) यांच्यावर शासनाच्या गलथान कारभारामुळे आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे आणि आज दिनांक 30 मे 2021 रोजी उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.1) मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे निवेदन करते संजय बनसोडे सर सात जण नियुक्ती झाल्यापासून शाळेवर कधीही नोकरीला आलेले नाहीत दिनांक 8 मार्च 2019 रोजी 20 टक्के अनुदान मंजूर झाले त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून खोटेनाटे करून आम्हाला काढून टाकले आहे.

अशी खोटी तक्रार समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जलील शेख औरंगाबाद यांच्याकडे देऊन दिलेला निकाल व दिलेला आदेश रद्द करण्यासाठी तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मान्यता मिळाल्यापासून 100% अनुदान देण्यासाठी व शाळेला अनुदान मिळवण्यासाठी तसेच अनुसूचित जातीच्या संस्थाचालकांना संरक्षण मिळावं या प्रमुख मागण्यासाठी मी लहु बनसोडे ( संस्थाप्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुजाती माध्यमिक आश्रमशाळा पाथरा) येथे राहत्या घरी महाराष्ट्र शासनाचे कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून माझ्या न्याय मागण्यासाठी उपोषणास बसलो आहे तरी संबंधित प्रशासनाने या सर्व गोष्टीचा विचार करून मला योग्य तो न्याय द्यावा मागण्या मान्य करून माझ्या शाळेला शंभर टक्के अनुदान देण्यात यावे.

अशी मागणी यावेळी संस्थाप्रमुख लहु बनसोडे यांनी यावेळी केली पुढे बोलताना असे म्हणाले की आज पर्यंत शासनाने माझ्यावर व माझ्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर खूप अन्याय केला आहे खास करून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड सचिन मडावी साहेब व प्रादेशिक उपायुक्त जलील शेख हे मला वारंवार त्रास देत असतात .संजय मोतीराम बनसोडे व इतर सात जण नियुक्ती दिल्यापासून एकही दिवस शाळेत न येता शाळेला 20 टक्के अनुदान मंजूर झाल्यानंतर खोटेनाटे पुरावे गोळा करून आम्हाला काढून टाकला आहे व अतिरिक्त पैशाची मागणी केली आहे अशी खोटी तक्रार सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी साहेब यांच्याकडे केली व पुढे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख यांच्याकडे बनावट पुरावे दाखल करून माझी बाजू कसलीच ना ऐकून घेता एकतर्फी निकाल दिला आहे हा निकाल मला मान्य नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.