अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला मराठा महासंघ बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती अनिताताई बंडू तनपुरे यांची नियुक्ती

29

✒️अंबादास पवार(बुलढाणा प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.30मे):-अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला मराठा महासंघ बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्यां श्रीमती अनिताताई बंडू तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.शशिकांतजी पवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सरचिटणीस मा. राजेंद्र कोंढरे यांच्याशी सल्ला मसलत करून ही नियुक्ती करण्यात आली.

नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष श्री. रामदादा मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष श्री. गणेशभाऊ माने, श्री. रमाकांतजी गलांडे, जिल्हा सरचिटणीस श्री. किशोर भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष श्री.सुभाष शेळके, माजी शहराध्यक्ष श्री. संजय शिनगारे, शहर अध्यक्ष राजेश मुळीक, विकास चव्हाण, संभाजीराव तनपुरे, संतोष येवले, उपस्थित होते.श्रीमती अनिताताई बंडू तनपुरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कारकीर्दीस उपस्थीतांनी हार्दिक शुभेच्छा.