‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ निमित्ताने शपथविधी कार्यक्रम

33

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

कोथरूड(दि.31मे):-संपूर्ण जगात जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातोय. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्यासाठी हा जनजागृती दिवस म्हणून आयोजित केला जातो. तंबाखू सेवनाने आपल्या भारत देशात दरवर्षी 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावतात.त्यामध्ये तंबाखू खाणाऱ्या 36 % पुरुष व 5 % महिला आहेत.

तंबाखुमुळे हृदयरोग,कर्करोग,यकृताचा आजार,फुफ्फुसाचे आजार,टीबी यासारख्या प्राणघातक आजार होतात.तंबाखू खाण्यापासून विशेषतः वरील आजारापासून नागरिकांना रोखण्यासाठी आज युवकमित्र परिवारातर्फ ‘कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी भागात ‘तंबाखुविरोधी दिन शपथ’ घेण्यात आली. यावेळी आरोग्य विभागासह नागरिक सहभागी होते.