सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी संघर्ष करु -आमदार श्र्वेताताई महाले

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

हिंगोली(दि.2जून):- जिल्ह्यातील कळमनुरी येथे मराठा आरक्षण संदर्भात विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी व मराठा समाजातील बांधवांची आमदार श्र्वेताताई महाले यांनी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.आपण सर्वच जण राजकीय जोडे बाजूला ठेऊन आरक्षणाच्या लढाईत समाजाच्या पाठशी उभे रहावू, जे आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे ते पुन्हा मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी संघर्ष करु असे आवाहन यानिमित्ताने आमदार श्र्वेताताई महाले यांनी सर्वांना केले.

यावेळी आमदार श्री तानाजीराव मुंटकुळे , माजी खासदार श्री शिवाजीराव माने, माजी आमदार श्री रामराव वडकते, जिल्हाध्यक्ष श्री शिवाजीराव जाधव, माजी आमदार श्री गजानन घुगे, श्री मा पंडितदादा देशमुख, श्री पंजाबराव धनवे पाटिल, श्री नारायणराव खेडेकर , महेश गोविंडवार , रुपेश कदम तालुका अध्यक्ष, मोतीराम देशमुकख जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा , राहुल माने , अशोक संगेकर , आशिष दरक , प्रतीक साळोख, सौ पुष्पाताई शिंदे, डॉ संतोष कल्याणकर मराठा क्रांती मोर्चा, पी आर देशमुख, ऍड माकने सर , यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी व मराठा समाज बांधव उपस्थित होते.