तीन डॉक्टरांना ISSN इंटरनेशनल रिसर्च विभूषण 2021 अवार्ड

28

🔸डॉ.सोनल वानखेड़े, डॉ. नितेश कांबळे, डॉ. कविता खोंड यांचा समावेश

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

खापरखेडा(दि.3जून):- नागपुर जिल्ह्यातील तीन डॉक्टराना त्यांच्या संशोधन विषयाचे काम पाहता ISSN इंटरनेशनल रिसर्च विभूषण 2021 या अवार्ड ने गौरवान्वित करण्यात आले आहे .

इंटरनेशनल सोसाइटी फ़ॉर सायंटिफिक नेटवर्क अवार्डच्या आंतरराष्ट्रीय कमिटीद्वारे समाजाला लाभदायक अश्या वैज्ञानिक विषयांवर उत्कृष्ट संशोधन करणारे डीन, प्रोफेसर, प्राध्यापक, साइंटिस्ट, संशोधक आणि स्कॉलर्स यांना दरवर्षी रिसर्च विभूषण या अवार्डने गौरवान्वित करण्यात येते . यावर्षी नागपुरातील आयुर्वेदिक महाविद्यालयच्या मुख्याध्यापिका डॉ. कविता खोंड सहित डॉ.सोनल वानखेडे आणि डॉ. नितेश कांबळे या दोन युवा डॉक्टराना यावर्षीच्या रिसर्च विभूषण या अवार्डने गौरवान्वित करण्यात आले आहे.

या तिघानी आयुर्वेदिक इम्युनोमॉड्यूलेशन थेरेपी इन पोस्ट कोविड केअर या विषयावर संधोधन केले आहे .
डॉ नितेश कांबळे आणि डॉ सोनल वानखेड़े (कांबळे) हे बीएएमएस ,एमडी पदविका प्राप्त असून डॉ नितेश कांबळे हे शताब्दी चौक नागपुर येथे खाजगी क्लिनिक चालवतात आणि डॉ सोनल वानखेड़े (कांबळे) या बीएएमएस पदविका प्राप्त आहेत.

सोबतच डाइट व योगा काउंसलर असून शुद्ध आयुर्वेद पंचकर्म केंद्र सुद्धा चालवतात आणि के. आर. पांडव आयुर्वेदिक महाविद्यालय नागपुर येथील नवीन विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतात . डॉ. कविता खोंड सुद्धा याच महाविद्यालयात मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहेत . रिसर्च विभूषण अवार्ड प्राप्ति साठी तिघाना त्यांचे आई वडिल व नातेवाईक सहित नागपुरकरांनी सुद्धा शुभेछ्या दिल्या आहेत.