निसर्ग चाहता युवकांचा वाढदिवस ५० वृक्ष लागवड करून अनोख्या पद्धतीने साजरा

23

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.3जून):-वाढदिवसाचा अनावश्यक खर्चाला आळाघालत पाटोदा येथील निसर्गचाहत्या युवकाने ५० वृक्ष लागवडीचे आपला वाढदिवस साजरा करून एक आदर्श युवकांसमोर ठेवला.वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांची संकल्पना मांडताना शुभम म्हणाला आज जी घराच्या अवती भोवती असलेले झाडे,आणि त्या झाडांपासून आपणाला मिळणारी शुद्ध हवा , निसर्गरम्य वातावरण,फळे,फुले जी मिळत आहे ती आपल्या पूर्वजांची देणं आहे.त्यांनी वृक्ष लागवङ केली नसती तर आज नक्कीच हे निसर्गमय वातावरण, फळे,फुले आपणाला मिळाली नसती. मग आपणही या निसर्गाचे काही देणं लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवत येणाऱ्या नवीन पिढीसाठी देखील आपण झाडे लावले.

पाहिजे तसेच ऑक्सीजन ची खरी किंमत आपल्याला कोरोना महामारीत कळालीच त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. वृक्ष लागवडीनंतर एक नवीनच प्रेरणा आपणाला मिळते. आज निसर्गसंवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.निसर्गसंवर्धनासाठी प्रत्येकाने थोडाफार हातभार लावला तर एक दिवस नक्कीच निसर्गमय आणि शुद्ध हवा असलेले वातावरण निर्माण होईल. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करायला हवे.

वाढदिवसानिमित्त येवला तालुक्यातील पाटोदा येथील शेतकरी पुत्र चि. शुभम बोरनारे याने स्वतः ५० झाडे लावून त्यांना पाणी घालण्यासाठी ड्रिप ची व्यवस्था केली आहे. तसेच गावातील युवकांना सोबतीला घेऊन त्यांना देखील किमान एक वृक्ष लावण्याचे आव्हान केले आहे. त्यांना रोप स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहे.

या प्रसंगी नाशिक जिल्हा प्रहारचे गणेश निंबाळकर,प्रहार येवला तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन,चांदवड प्रहार तालुका अध्यक्ष प्रकाश नाना चव्हाण,प्रहार येवला तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे,प्रहार पाटोदा शाखाअध्यक्ष चेतन बोरनारे,उपाध्यक्ष श्याम मैंगाणे,प्रहार पाटोदा गटप्रमुख सुनील पाचपुते, दत्तात्रय बोरनारे,साईनाथ कुंभारकर,संजय मेंगाने,किशोर भोसले, दीपक बोरनारे,गणेश पंडित, पंढरीनाथ बोरणारे ग्रामस्थ व युवावर्ग वृक्षरोपणासाठी उपस्थित होते.