शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही-आमदार राजेश एकडे

30

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.4जून):-बेलुरा शिवारातील शेत रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजेश एकडे यांनी केले.शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी आमदार राजेश एकडे यांनी केले.यावेळी आपल्या शेती मधील जागा उपलब्ध करून देणाऱ्या कमलाबाई विश्वासराव शिंगोटे यांचा सत्कार करण्यात आला.

सदर भूमिपूजन समारंभास शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानराव धांडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.अनिल धनोकार,श्री.संजय सिंह राजपूत,उपसरपंच सीमाताई मेहेंगे,ग्रामपंचायत सदस्य सत्यभामाताई घनोकार, शुद्धमतीताई घनोकार, प्रतिभाताई घनोकार,संगीताई तांगडे, मधुकर हिवाळे, माजी सरपंच विनोद मेहेंगे,पंढरीभाऊ पाटील,जवळा बाजार येथील सरपंचपती अशोकभाऊ डीवरे प्रामुख्याने उपस्थित होते..