५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व कवडू लोहकरे यांचे वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

67

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.५जुन):- “जागतिक पर्यावरण दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी कवडू लोहकरे यांचे वाढदिवसानिमित्त चिमुर, नेरी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.पृथ्वी ला हिरवेगार करण्यासाठी व पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ५ जुन हा दिवस साजरा करतो. दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे.

पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी व सजीव सृष्टी ला वाचविण्यासाठी पृथ्वी, जल, वन्यजीव यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. झाडांची दिवसेंदिवस होणारी कटाई व जंगलाचा होणार -हास हि चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचे संवर्धनासाठी पर्यावरण संवर्धन समितीकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे,सुशांत इंदोरकर, पिपलायन आष्टनकर, विशाल इंदोरकर, मंगेश वांढरे,मयुर कुंदोजवार, कैलास राखडे,भुनेश वांढरे, राहुल गहुकर आदी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते