माण-खटावच्या जनतेच्या आरोग्यासाठी म्हसवडला जंबो कोव्हीडची मान्यता , जंबोच्या कामाला सुरुवात, “आम्ही म्हसवडकर”च्या प्रयत्नाला यश

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.5जून):- माण खटाव या दुष्काळी दोन तालुक्यातील वाढती कोरोना बांधीतांची संख्या व उपलब्ध बेडची संख्या यामुळे चांगल्या उपचाराची सोय या दोन तालुक्यात नव्हती सातारा ते म्हसवड ९५ किलोमीटर अंतर आजार रुग्णांना नेहणे धोक्याचे होते अशा परिस्थीतीत आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या युवकांनी लोकवर्गणीतुन लोकसहभागातुन१६ आॅक्शीजन बेडचे कोव्हीड सुरु करुन सातशे ते आठशे रुग्णाचे जिव वाचवून पांच कोटी रुपये वाचवण्यात यश आले आम्ही म्हसवडकरांच्या कोव्हीडची चर्चा गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पर्यात गेली होती.

याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माण खटावच्या जनतेसाठी माण मध्येच १५० खाटाचे जंबो कोव्हीड उसे करण्याच्या सुचना केल्यानंतर परवा जिलाधिकारी यांनी म्हसवड मध्ये येवून पहाणी करुन शिक्कामोर्तब केला होता तर आज उपजिलाधिकारी रामचंद्र शिंदे व सातारा जिल्हा बांधकाम विभागाचे ईजिकेटिव्ही इंजि. दराडे साहेब यांनी आज दुपारी नियोजित म्हसवड येथील जंबो कोव्हीडच्या जागेची पहाणी करुन प्रांतांधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना तातकाळ लाईटच्या फिटिंगची, इमारत दुरुस्ती, स्वतंत्र लाईटचा ड्रान्सफार्मार, आदीची व्यवस्था करण्याच्या सुचना उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन कमीटीचे सदस्य प्रभाकर देशमुख, जिल्हा बॅकेचे संचालक अनिल देसाई नगराध्यक्ष भगतसिंह विरकर, आम्ही म्हसवडकर ग्रुपचे युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, राहुल मंगरुळे,एल के सरतापे, डॉ राजेन्द्र मोडासे, डॉ राजेश शहा, डॉ रोहण मोडासे, प्रशांत दोशी, खंडेराव सावंत, बाळासाहेब काळे,बाळासाहेब सावंत अभिजीत केसकर, प्रितम तिवाटणे, भिवरे, बंटी माने पिंटूशेठ जगदाळे, गणेश माने ,अविनाश मासाळ , आकाश माने, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष , हणमंत पाटिल, माजी नगराध्यक्ष विजय धट,संजय टाकणे, माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी , तहसीलदार बाई माने, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ भारत काकडे, मुख्याधिकारी डॉ सचिन माने,माजी उपनगराध्याक्ष धनाजी माने,तलाठी उमरसिंग परदेशी,सुर्यवंशी तलाठी सह तालुक्यातील बाधकाम विभागाचे व विजमंडळाचे अधिकारी उपस्थित होते

यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले माणखटाव हे कायम दुष्काळी तालुके म्हणुन ओळखले जातात दुष्काळा प्रमाणे या दोन तालुक्याला निधीची व पाण्याची आस कायम होती व आहे उपचाराची कोणतीच साधते या परिसरात नव्हती त्यात म्हसवड हे सातारा पंढरपूर हायवेवरील महत्त्वाचे शहर आहे. सदर हायवेचे नव्यानेच रस्ता दुरुस्ती काम झालेले आहे. या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तातडीच्या सुविधा न मिळाल्यामुळे अपघातग्रस्तांचे भयानक हाल होत आहे. म्हसवडपासून पंढरपूर ६० किलोमीटर तर सातारा ९५ किलोमीटर कराड ८० किलोमीटर, फलटण ६५ किलोमीटर अंतरा पर्यात जख्मी ,उपचारासाठी नेहलेला पेशन्ट माघारी जिवंत येईल रांची खात्री नव्हती तातडीच्या आरोग्यसुविधा या परिसरात होत नाही.

यावेळी अनिल देसाई यांनी अधिकारी यांना माहिती सांगताना म्हणाले माण तालुक्यात गोंदवले व दहिवडी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र पुरेशा सुविधा उपलब्ध नाही. माण व खटाव या दोन तालुक्यातील कोव्हीड रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळून लोकांचे जिव वाचावे यासाठी दोन तालुक्यासाठी आम्ही म्हसवडकर यांनी लांब वस्तीवरील निवाशी शाळेत आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या माध्यमातुन सुरु असलेल्या १६बेडचे डीसीएचसी कोव्हीड सेंटर मधील एका इमारती मध्येच १५० बेडचे आॅक्शीजन, व्हेन्टिलेटर व विलगीकरण असे दोन्ही तालुक्यातील लोकासाठी जंबो कोव्हीडची पहाणी करुन कामाला सुरवात करण्यात आली असुन १५ ते२० दिवसात आम्ही म्हसवडकरांचे जंबो कोव्हीड उभे करणर असल्याची माहिती उपजिलाधिकारी शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कमीटीचे सदस्य मा प्रभाकर देशमुख , जिल्हा बाॅकेचे संचालक अनिल देसाई व आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या सदस्यांना सांगीतले

प्रभाकर देशमुख सध्या आम्ही म्हसवडकर ग्रुपचे लोकसहभागातुन सुरु असलेल्या कोव्हीड सेंटर मधील दोन इमारती मध्ये माण खटावच्या जनतेसाठी म्हसवड येथे जंबो कोव्हीड हाॅस्पिटल कोरोना बांधीतांवर उपचार होणार आसल्याने या जंबो कोव्हीड मंजूरीने माण खटावच्या जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. तसेच जनतेचा वेळ व पैशाची बचत होईल.

अनिल देसाई
आम्ही म्हसवडकर ग्रुपने १४ महिणे लोकांचे जिव वाचवण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक सर्वत्र होता असतान परवा जिल्हाधिकारी शेखर सिंह साहेबांनी इतर तालुक्यात म्हसवडकरांच्या कामाचे कौतुक करत होते गेल्या महिण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा व आरोग्य मंत्री टोपे साहेबांनी ही म्हसवडकरांच्या कामाची माहिती घेऊन माण मध्ये दोन्ही तालुक्यातील लोकासाठी जंबो कोव्हीड उभे करण्याच्या सुचना दिल्याने म्हसवड येते मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे तेथे हे जंबो करण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला सारुण जनहित लक्षात घेऊन कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन हे जंबो कोव्हीड हाॅस्पिटल माण खटावच्या जनतेसाठी लवकरच सुरु करणार आहे