कोरोनावर उपचार करणाऱ्या 24 हॉस्पिटलचे लेखापरीक्षण होणार

30

🔸आंबेडकरी चळवळीचे शिलेदार विकास धाइंजे,वैभव गिते या जोडीच्या प्रयत्नांना यश

🔹लेखापरीक्षण प्रामाणिकपणे केल्यास सत्य बाहेर येईल..विकास दादा धाइंजे.

🔸लेखापरीक्षनाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवणार – वैभव गिते

✒️माळशिरस(पुरोगामी संदेश नेटवर्क)

माळशिरस(दि.5जून):-कोरोना कोविड 19 या बाधित रुग्णांच्या व नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या बिलांबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांच्याकडे केल्या होत्या याची दखल घेऊन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने मुख्यमंत्री महाराष्ट्र व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अकलूज यांनी दि.27 मे 2021 रोजी माळशिरस तालुक्यातील 24 हॉस्पिटलचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले आहेत या आदेशात रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांचे देयकांचे लेखापरीक्षण कारणेकामी लेखा परीक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेखा परीक्षण पथकाचे नोडल ऑफिसर श्री.डी.एच. मिसाळ हे दि.1जून 2021 पासून रजेवर जात असल्याने लेखापरीक्षणात खंड न पडता,लेखा परिक्षणाचे काम नियमितपणे सुरू राहील,यादृष्टीने मिसाळ यांचे जागी इतर अधिकारी यांची श्रीमती यु.आर.देसाई,नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.एकूण 24 हॉस्पिटल चे लेखापरीक्षण नोडल अधिकारी श्रीमती देसाई नायब तहसीलदार यांचे निरीक्षनाखाली इतर अधिकारी व कर्मचारी यांनी करावयाचे आहे.
यामध्ये 1)अश्विनी हॉस्पिटल अकलूज,2)अकलूज क्रिटिकेअर हॉस्पिटल अकलूज,3)हेगडे हॉस्पिटल अकलूज 4)कदम हॉस्पिटल अकलूज 5)अभय क्लिनिक अकलूक 6)राणे हॉस्पिटल अकलूज 7)देवडीकर हॉस्पिटल अकलूज 8)सन्मिती हॉस्पिटल अकलूज 9)गुजर हॉस्पिटल अकलूज 10)अश्विनी हॉस्पिटल नातेपुते 11)वाघमोडे हॉस्पिटल नातेपुते 12)अश्विनी हॉस्पिटल नातेपुते (ICU)
13) अकलाई ICU हॉस्पिटल,अकलूज 14)निदान हॉस्पिटल,श्रीपुर,15) स्रेयश हॉस्पिटल श्रीपुर 16) नातेपुते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 17) आर्या हॉस्पिटल,नातेपुते 18)देवडीकर हॉस्पिटल अकलूज
19)श्रीराम चाईल्ड हॉस्पिटल,संग्रामनागर 20)माने-देशमुख हॉस्पिटल वेळापूर 21)गायकवाड हॉस्पिटल अकलूज 22)नवजीवन हॉस्पिटल अकलूज 23)वरद हॉस्पिटल माळशिरस 24)माळशिरस कोव्हिड हॉस्पिटल इत्यादींचे लेखापरीक्षण होणार असून लेखापरीक्षणाचा दैनंदिन अहवाल प्रांत यांचे सहीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवणे बंधनकारक आहे.
*हॉस्पिटलचे लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्तव्य*
1) मुख्य सचिव महाराष्ट्र शासन अधिसूचना 21 मे 2020 मधील निर्देशांचे खाजगी रुग्णालयांकडून काटेकोरपणे पालन होते किंवा कसे?
2)एकूण बेडच्या 80 टक्के बेडचे दर हे शासनाने नियमित केलेल्या दरानुसार आकारण्यात यावे.उर्वरित 20 टक्के बेडसाठी रुग्णालयाचे प्रचलित दरानुसार दर आकारण्यात यावेत.त्याप्रमाणे आवश्यक बेडची उपलब्धता करण्यात आली आहे किंवा कसे? याची तपासणी करने.
3) सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचना दि.21.5.2020 अन्वये कोरोना रुग्णांना ऍडमिट व डिस्चार्ज केले जाते किंवा कसे ?
4)शासकीय अधिसूचनेनुसार कोव्हिड व इतर रुग्णांसाठी दर अनुसुचि ब व क मधील निर्धारित दराप्रमाणे आकारण्यात येते किंवा कसे ?याबाबत खात्री करणे
5)कोव्हिड 19 ची लक्षणे नसलेल्या रुग्णांना आवश्यकता नसताना अतिदक्षता विभागामध्ये बेड देण्यात आहेत काय?याची तपासणी करणे
6)कोव्हिड 19 रुग्णांना खाजगी रुग्णालये नियमानुसार वाजवी देयके आकारतात किंवा कसे?याची आठवड्यातुन दोनदा तपासणी करणे
7)कोव्हिडं 19 रुग्णाची देयकबाबत तक्रार असल्यास सदर तक्रारीचे तात्काळ निराकरण करणे
सदरकामी कुचराई केल्यास संबंधीतांवर केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005 चे कलम 56 अन्वये तसेच भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला,असे मानण्यात येईल.असे उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी दि.27 मे 2021 रोजीच्या आदेशात म्हंटले आहे.
माळशिरस तालुक्यातील जनतेने रुग्णालयांच्या मनमानी कारभाराची माहिती आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाइंजे ,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती.