जागतिक पर्यावरण दिन

78

माणूस हा स्वतःत एक स्वार्थी प्राणी आहे,माणसाने नेहमी स्वतःला सोडून या जीवसृष्टीतील अन्य कोणत्याही घटकाच विचार केल्याचे विशेषतः दिसून येत नाही व स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गा सोबत छेडखाणी करत पर्यवरणा ला कळत न कळत असंख्य नुकसान पोहचवले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज कदाचित भारता सारख्या देशात ज्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा अशे तीन ऋतू मानले जातात व त्यांचा निश्चित काळ सांगता येतो अश्या ऋतूत देखील आज मोठा बदल झालेला दिसून येतो.आज उन्हाळ्यात भरपूर पाऊस पडतो तर हिवाळ्यात भरूपर ऊन निघते शिवाय थंडीही भरपूर पडते असं निसर्गाचं असमतोल आपण सर्व मानव जातीने बनवलेला आहे.

आज विज्ञानाचा युग आहे माणसांनी प्रगती करायलाच पाहिजे नवे नवे शोध लावायला पाहिजे हे काळाची देखील गरज आहे परंतु निसर्गाशी छेडखाणी न करता. आज कोरोना सारख्या महामारीने सम्पूर्ण विश्वात हाहाकार माजवले असतांना कोरोना मुळे आज असंख्य लोक त्रस्त आहे .कोरोना मुळे खूप हानी झाली हे निश्चितच परंतु असे असताना देखील आज आपल्याला कोरोना चे आभार देखील मानायला पाहिजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रमाणे कोरोना मुळे जितके वाईट परिणाम झाले तितकेच चांगले सुद्धा परिणाम झाले .आज आपल्या सोबत जे वाईट झालं त्यातून धडा घेऊन व कोरोना नि आपल्याला जी शिकवण दिली ते आज आपण अंगीकारायला पाहिजे.

कोरोना ने आज प्रत्येक माणसाला सामान्य पद्धतीने जगायला शिकवले आज प्रत्येकाला कडल आहे की त्याची मूलभूत व प्राथमिक गरज काय आहे मानुस आगाऊ चा खर्च किंवा शौक न करता देखील जगू शकतो .आज कोरोना मुळे आपल्या पर्यावरणात देखील मोठा सुधार झाला आहे ,दिल्ली ,मुंबई,कोलकाता, चेन्नई सारख्या असंख्य दाट वस्ती च्या शहरात जल प्रदूषण,वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण कमी झालेला आहे हे आज आपल्याला कोरोना कडून घ्यायला पाहिजे आज कोरोना ने पर्यावरणाचे संतुल बनवण्यात सर्व मानव जातीला मोठी मदत करून दिली आहे आता समोर माणसाचं उत्तरदायित्व आहे कर्तव्य आहे , या पर्यावर्णाचे संतुलन टिकून ठेवण्याचे त्या साठी आज प्रत्येकाला जस जमेल त्या माध्यमातून योगदान देणं गरजेचं आहे प्लास्टिक चा वापर कमी करणे, विना कारण गाडी घेऊन फिरणे थांबवने.

शक्य तो वर मोठ्या सण समारंभात Dj किंवा या सारख्या अन्य उपकरणाचा वापर कमी करणे असे असंख्य उपक्रम माणूस वयक्तिक जीवनात करून देखील पर्यवर्णाचे संतुल टिकवून ठेऊ शकतो आता प्रत्येकाला वाटत असेल माझ्या एकट्याने काय होणार तर “थेंबे थेंबे तळे साचे” या गोष्टीला सगळ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे .

शिवाय आज आपल्याला तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे ।।वृक्षवल्ली आम्हा सोयरे सखे वनचरे।। ह्या गोष्टीचे पालन करून वृक्ष वन यांनाच आपले खरे नातेवाईक समजावे व त्यांची काळजी घ्यावी हे देखील गरजेचे आहे.म्हणून आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतांना सर्वांना एकच विनंती राहील सगळ्यानी जस जमेल तसं पर्यावरणाच्या संरक्षणात व पर्यावरण संतुलनात आप आपलं योगदान द्यावं.

✒️लेखक:-अनुप कोहळे(मो. 9923815724)मु. राजनगट्टा जिल्हा- गडचिरोली