जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा रिपाई च्या वतीने नंदिनी नदी पुनरुज्जीवन व संवर्धन अभियान

33

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.6जून):-आगर टाकळी ला ५ जून 20२१ रोजी येथे भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून नंदिनी नदीला प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नंदिनी नदीने मोकळा श्वास घेऊन व तीस गतवैभव प्राप्त करून नाशिकरांसाठी आकर्षक केंद्र व्हावे यासाठी भाजपच्या व रिपाइंच्या वतीने स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम हाती घेतली..मानवी साखळी करून व आरती करून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली..कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे जुने नाशिक मंडल अध्यक्ष आदरणीय भास्करराव घोडेकर होते तर.

*प्रमुख पाहुणे म्हणून भाजप पर्यावरण मंच चे अध्यक्ष उदयजी थोरात नगरसेवक अनिलभाऊ ताजनपुरे मा.नगरसेवक प्रा. कुणालभाऊ वाघ रिपाई आ उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे हे होते..

*प्रसंगी उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या डॉ.माधवी गायकवाड,जेष्ठ नेते कैलासजी वैशंपायन,ज्येष्ठ नेते बाबूजी लोखंडे,इंदू शर्मा,रतन भाऊ काळे,दिपक पाटील,महेंद्रजी सूर्यवंशी,युवा नेते लखन पगारे, सचिन गायकवाड,लक्ष्मण पगारे,विक्रांत गांगुर्डे,हिंदी भाषिक आघाडी नेते के.के दीपक,अतुलजी शिरसागर,अमितजी शुक्ला, सुमन विश्वकर्मा,कविताताई तेजाळे, दीपक राऊत,पवन पवार, मयुरेश जाधव, संदीप सारूक्‍ते यांसह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.