शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

26

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.6जून):- “अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला”हि उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या,व शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडाचा विनाश घडवत भूमीपुत्रांच्या मनामनात स्वांतंत्र्याची उर्मी निर्माण करुन, “सार्वभौम” स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा छावा युवा संघटनेच्या संपर्क कार्यालयात दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बालाजी पाटील ढगे, योगेश पाटील मोरे, अविनाश पाटील हिवराळे, छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे, डाॅ. अमोल पाटील ढगे अविनाश पाटील कदम, योगेश्वर पाटील कदम यासह अनेक मावळे उपस्थित होते..