चिखली पंचायत समिती येथे शिव स्वराज्य दिन

31

✒️अंबादास पवार(विषेश प्रतिनिधी)

चिखली(दि.6जून):- महाराष्ट्र राज्यात प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये पंचायत समिती चिखली येथे शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्यगुडी उभारून उत्साह मध्ये साजरा करण्यात आला…

आज पंचायत समिती, चिखली येथे स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा केला. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी मा. आमदार श्र्वेताताई महाले ,सभापती सिंधुताई तायडे ,पंडितराव देशमुख , डॉ कृष्णकुमार सपकाळ, संतोष काळे पाटिल , अंकुशराव तायडे , गट विकास अधिकारी हिवाळे साहेब,गटशिक्षण अधिकारी शिंदे साहेब , बालविकास अधिकारी गवळी साहेब, पाटोळे सर, भागवत पाटिल सर उपस्थित होते