कुपटी ग्रामपंचायत येथे मोठ्या थाटात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

21

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.7जून):- तालुक्यातील कुपटी ग्रामपंचायत येथे मोठ्या थाटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

कुपटी गावचे प्रथम नागरीक सरपंच श्री सुदर्शन गणेशराव ठाकरे यांच्या हस्ते भगव्या झेडाची स्वराज्य गुडी उभारण्यात आली होती.व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी सुरेश बरडे (उपसरपंच ), अशोक ठाकरे (पोलीस पाटील), देवानंदजी मोरे (माजी उपसरपंच) इतर अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरवात गरजा महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आली व राष्ट्रगीताने शेवट करण्यात आली.