आक्सिजन फाॕर एव्हरीवन अंतर्गत वृक्षारोपण आणि बिजारोपण संपन्न …

43

🔹राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा विशेष उपक्रम

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.सध्या पर्यावरणाच्या विविध समस्येने सर्वत्र उग्र रुप धारण केलेले असून त्याचे परिणाम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जाणवू लागले आहे .या संबंधात गेल्या ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती च्या वतीने वृक्षारोपणाच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. परिषदेच्या अधिकृत व्हॕट्सॲप ग्रूपवर असलेल्या सदस्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमिताने आक्सिजन फाॕर एव्हरीवन हा अभिनव उपक्रम हाती घेतला. सदस्यगणांनी आणि पर्यावरण स्नेही मंडळींनी आपआपल्या घरी,शेतात,परसबागेत तर काहिनीं शाळेच्या आवारात ,मैदानाच्या कडेला वैयक्तिक स्वरूपात वृक्षारोपण केले .

या अभियानाअंतर्गत प्रत्येकांनी आपल्या परिसरात ५ झाडाची रोपे तसेच काहींनी ५ झाडाची बिजारोपण केले आणि पुढील दोन वर्ष तरी पूर्णपणे काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली.
बामनी येथील विनायक साळवे यांनी दिवं. अॅड. एकनाथराव साळवे यांचे स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण केले.बंडोपंत बोढेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक दिवं. डाॕ. किसन पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ,चंद्रशेखर पिदुरकर यांनी राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत श्रीमती इंदिरा गांधी विद्यालय चक विरखल येथे , ज्येष्ठ प्रचारक दिवं. बळीरामजी धकाते स्मृतीप्रित्यर्थ गडचिरोली येथे उदय धकाते आणि सौ. सुचिता धकाते यांनी वृक्षारोपण व बिजारोपण केले, दादाजी झाडे यांनी सुबई आश्रम शाळा परिसरात , वृक्षारोपण केले तर प्रचारक त्र्यंबक बन्सोड यांनी ब्रम्हपुरी येथे , विलास उगे यांनी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ उर्जानगर येथे, श्रीगुरूदेव सेवा मंडळ आणि महिला शाखेच्या वतीने यांनी कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य आणि आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे स्मृतिप्रित्यर्थ उर्जानगर येथे वृक्षारोपण केले.

युवा प्रचारक राजु धोबे यांनी चारवट येथे, महेंद्र दोनाडे यांनी गोंदिया जिल्ह्यातील राका येथे स्मृतीशेष पूर्णचंद्र साळवे आणि १६ व्या संमेलन स्मृतीप्रित्यर्थ नवजीवन विद्यालय राका येथे वृक्षारोपण केले. प्रचारक हरिश्चंद्र बोढे यांनी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन च्या सहकार्याने भारोसा येथे संमेलनाच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले. प्रेमदास मेंढुलकर यांनी दिवंगत प्रचारक अर्जुन आर्य भारतीय स्मृतीप्रित्यर्थ नवरगाव च्या सेवा मंडळ परिसरात तर राजुरा येथे वेगवेगळ्या भागात सुभाष लोहे, रंजना लोहे , प्रदीप वासाडे,विठाबाई वासाडे,शैलेश कावळे,मयंक कावळे, मोहनदास मेश्राम ,प्रभाकर बोबाटे,मनोहर बोबडे ,अनिता बोबाटे , अवि पाटील ,सुभाष पावडे यांनी वृक्षारोपण केले. चिमूर येथे अशोक चरडे, वैभव चरडे येथे बळीरामदादा कामडी स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले. चेतन ठाकरे यांनी पोवराबाई गोंदोळे स्मृतिप्रित्यर्थ आरमोरी येथे वृक्षारोपण केले.चंद्रपूरात औद्योगिक क्षेत्रात नामदेव गेडकर ,बंडू टेकाम, कार्तिक चरडे, नारायण सहारे यांनी वृक्षारोपण केले . टेकाडी येथील मुख्याद्यापक राजेश सावरकर , नामदेव पिज्दूरकर यांनी
राष्ट्रीय हरित सेना उपक्रमाअंतर्गत देवनिल विद्यालयात वृक्षारोपण केले.

हरिदास पा.मासिरकर स्मृतीप्रित्यर्थ प्रभाकर आवारी यांनी राष्ट्रवादी नगर येथे वृक्षारोपण केले.चंद्रपूरात प्रतिभा रोकडे , विजय चिताडे ,अण्याजी ढवस आणि तुकूम येथील
ग्रामगीता श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी वृक्षारोपण केले.तसेच सौ.अंजलिना साळवे यांनी पायली येथे, श्रीक्षेत्र देहु येथे प्रचारक सुरेश देसाई यांनी रामकृष्ण अत्रे महाराज स्मृतिप्रित्यर्थ मल्हार गड येथे वृक्षारोपण केले. श्रीक्षेत्र देहु येथे अनिरुद्ध देसाई आणि वेदिका देसाई यांनी बबनरावजी वानखेडे स्मृतिप्रित्यर्थ वृक्षारोपण केले.तसेच परसोडी येथे नेहा सुर आणि विश्वास सुर यांनी वृक्षारोपण केले तर रामपूर येथे भाऊराव बोबडे आणि अनिल चौधरी, श्रध्दा हिवरे यांनी वृक्षारोपण केले.

प्रचारक संजय वैद्य यांनी विकास नगर वरोरा येथे , प्रकाश ढोबे,युथिका ढोबे,साविका ढोबे तसेच मुठरा येथे सदानंद बोबडे व मित्र परिवार यांनी वृक्षारोपण केले , सिंदीपार चे पालिकचंद बिसणे यांनी वृक्षारोपण केले. ॲड. राजेंद्र जेनेकर ,ॲड. सारिका जेनेकर यांनी स्मृतीशेष माधव पा.जेनेकर आणि पुरूषोत्तमजी हिरादेवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले .श्रीगुरुदेव सेवा मंडळ मूल तर्फे गणेश मांडवकर, विलास मांडवकर, सुखदेव चौथाले, चंद्रशेखर पिदुरकर, विजय लाडेकर, गुरुदेव बोदलकर, प्रभा चौथाले, गणेश चौथाले, शिवम भाजीपाले आदींनी वृक्षारोपण केले. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आणि पर्यावरण अभ्यासक विजय मार्कंडेवार , ॲड.जेनेकर ,देवराव कोंडेकर ,नामदेव पिज्दूरकर ,सुभाष पावडे , शंकर दरेकर , पुरूषोत्तम चौधरी आदींनी विशेष परिश्रम घेतले.