वीटभट्टी मालकाचा प्रताप जाब विचारणा केल्या मुळे केली मारहाण

28

🔹गंगाखेड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7जून):- मजुरीच्या जाचातून भावाला काढण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावाला वीटभट्टी मालकाने केली मारहाण
गेली काही अनेक वर्षापासून सय्यद युनूस यांच्या वीटभट्टीवर फिर्यादी नितीन संभाजी गायकवाड राहणार धारखेड यांचा भाऊ व वहिनी काम करत होते. काम करून-करून त्यांचे शरीर खालावल्याने त्यांचा भाऊ नितीन हा वीटभट्टी मालक यांच्याकडे गेला,”माझ्या भाऊ वहिनीला कामावरून सुट्टी द्या त्यांना आता काम होत नाही.” त्यावर वीटभट्टी मालक “तुझ्या भावाकडे एक लाख पंचवीस हजार रुपये उचल आहे ती आणून दे नंतर भावाला घेऊन जा” पण तुम्ही तर दररोज त्याला रेशन आणण्यासाठीच पैसे देत होतात त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात बाकी कशी काय असेल असे म्हणत नितीन आपल्या राहत्या घरी निघून गेला.

नितीन हा घरी अंगणात बसला असताना चार जण येऊन संगणमत करून नितीनला तेरी हीम्मत कैसे हुई भट्टीपे आनेकी असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत,आई व वहीनीला धका देत खोऱ्याच्या दांड्याने पाठीवर ,पायावर ,हातावर मारहाण करून जखमी केले जखमी असलेल्या नितीनला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पचारासाठी आणले असता डोक्‍याला जबर मारहाण असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून परभणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हलवण्यात आले.

ही घटना दिनांक ४ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली नितीन हा जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी याठिकाणी उपचार घेत असताना दिनांक ६ जून रोजी गंगाखेड पोलिस ठाण्याला त्याचा जबाब प्राप्त झाला. त्याच्या जबाबावरून सलमान सय्यद, सुलतान सय्यद, नजीर सय्यद, फेरोज हे सर्व राहणार धारखेड यांच्यावर कलम 307, 34 सह कलम 3(1)(R)(s) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार हे करत आहे.