शिवराज्याभिषेक दिन अभिवादन करून केला साजरा

25

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7जून):- दि. ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्य शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.आज छत्रपती शिवाजी महाराज याचा शिवराज्याभिषेक दिना निमित्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर,आयोजक उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे हस्ते पूजन केले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मुंजाराम मुंडे, उपतालुका प्रमुख धोंडीराम जाधव शहर प्रमुख जितेश गोरे,नगरसेवक बाळासाहेब राखे, पंचायत समिती सदस्य माधवराव शेंडगे, नगरसेवक तुकाराम तांदळे,ओबीसी फाउंडेशन चे अध्यक्ष लक्षमन लटपटे युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख भागवत शिंदे,जामकर साहेब, उद्धव भोसले अमोल दिवान,बापूराव गायकवाड, पत्रकार भीमराव कांबळे, बालासाहेब कदम, अक्षय आंधळे,यौगेश मुरकुटे,बाळू साळवे आदीसह शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत गर्जना ने परिसर दुमदुमला होता.