रायभोळे रेशन दुकानात जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8जून):-शहरातील तुकाराम गुंडिबा रायभोळे रेशन दुकानातून प्रविण रायभोळे आणि पालक अधिकारी सय्यद मेहताब सर यांनी 7 जून रोजी 124 कार्डधारकांना नियमीत व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाचे मोफत चे धान्य वाटप करून जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला.

7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटास गरिबांना सामोरे जावे लागत असलेल्या, कठीण प्रसंगात केंद्र सरकारद्वारा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत माहे जून 2021 करिता अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या कार्डधारकांना अतिरीक्त प्रति सदस्य, प्रतिमहा 5 किलो धान्य मोफत वितरीत केले जात आहे.

अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यानी नियमीत धान्यासोबत अतिरीक्त प्रति सदस्य 5 किलो मोफत धान्याचा लाभ घ्यावा. आणि शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यानी नियमीत धान्याचा लाभ घ्यावा. असे आव्हान प्रविण रायभोळे यांनी केले आहे.कोणताही गरीब व्यक्ती या योजने पासून वंचित राहू नये म्हणून गंगाखेड शहरातील तुकाराम गुंडीबा रायभोळे रेशन दुकानदार, 8 जून ते 15 जून अन्न सप्ताह साजरा करून राहिलेल्या लाभार्थ्यांना धान्य वाटप करणार आहेत.