म्हसवड शहर पुन्हा लॉक ;व्यापारी वर्गात असंतोष

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9975686100

म्हसवड(दि.8जून):-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटे पेक्षा मोठे नुकसान झाले तर याच बरोबर म्हसवड व पालिका परिसरातील एप्रिल व मे या दोन महिन्यांत ५९ नागरीकांना मृत्यू आला तर आज पर्यंत १ हजार ९०३ नागरीक पाॅजीटिव्ह झाले त्यापैकी बरे झाले १ हजार ८१५ एप्रिल व मे च्या दुसऱ्या आठवड्यात बाधीत होण्याचे प्रमाण कमी होऊन मे व जूनच्या पहिल्या आठवड्यात पाॅजीटिव्ह होण्याचे प्रमाण कमी होऊन दोन महिन्यांत एका अंकाच्या पुढे गेली नाही तरी ही म्हसवड कंन्टेन्मेन्ट झोन करुन याच तालुक्यात ज्या गावात रोज १५ ते २० पाॅजीटिव्ही रुग्ण सापडतात ती गावे ते तालुके मात्र आज पासुन उघडण्यात आली.

मग एकाच जिल्ह्यात एका तालुक्याला वेगळा न्याय तर त्याच तालुक्यात एका गावातील दुकाने उघडी तर दुसरीकडे कंन्टेन्मेन्ट झोन असा म्हसवडला वेगळा न्याय का या अन्यया विरोधात उद्या मंगळवारी म्हसवड पालिकेच्या समोर पालिका पदाधिकारी, म्हसवडकर नागरीक, व्यापारी व्यावसायिक आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांना देण्यात आले आहे.दुसऱ्या लाटेत म्हसवडकरांनी सलग एप्रिल मे या दोन महिन्यांत चांगल्या प्रकारे कडक लाॅकडाऊन पाळल्याने एप्रिल मध्ये ६३२ तर मे मध्ये ४१६ असे एकुण १०४८ बाधीत झाले होते मात्र मे च्या शेवटच्या आठवड्यात बाधीत होण्याचे प्रमाण कमी झाले.

आज ही १ किंवा २ असेच शहरात रुग्ण सापडत आहेत एक अंकी रुग्ण म्हसवड यध्ये असताना आज पासुन जिल्हा उघडला मात्र म्हसवड मध्ये एक अंकी रुग्ण म्हणजे १ किंवा २ रुग्ण सापडतात तरी प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी म्हसवड मध्ये कंन्टेन्मेन्ट झोन केला आहे मात्र याच तालुक्यात दोन अंकी संख्या सापडत आहे ती गावे आज उघडली आहेत तर सातारा जिल्ह्यात माण सोडून सर्व तालुक्यांत सकाळी ९ ते २ व्यवहार सुरु केले मात्र म्हसवड मध्ये २४ मे पासुन ६ जून पर्यंत १२ दिवसांत तिनं दिवसात एक ही रुग्ण सापडला नाही बाकीच्या नवू दिवसी एक अंकी संख्या सापडत असताना म्हसवडला वेगळा न्याय का सोमवारी जिल्हाधिकारी यांनी अनलाॅक करून अत्यावश्यक सेवेतील दुकाने ९ ते २ यावेळेत उघडतील असे काल रविवारी सायंकाळी ५ वाजता जाहिर केले त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी, व्यापारी ,व्यावसायिक व फळविक्रेते यांनी आज सोमवारी सकाळी ९ वाजता अत्यावश्यक सेवेतील दुकाने, शेतकरी भाजीपाला , फळविक्रेते यांनी आपली दुकाने सांगुन विक्री सुरु केली होती.

अचानक दोन तासा नंतर प्रांताधिकारी यांचा फोन मुख्याधिकारी डॉ सचिन माने व एपीआय बाजीराव ढेकळे यांना आल्या नंतर त्यांनी शहरातील सर्व दुकाने बंद करताच नागरीकांत प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती नागरीक पालिकेसमोर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात माजी नगराध्यक्ष विजय धट नगरसेवक गणेश रसाळ, धनाजी माने,युवराज सुर्यवंशी, सुरेश पुकळे, कैलास भोरे, लक्ष्मण काळे, संजय टाकणे प्रविन दोशी, परेश व्होरा, अभिराज नागमल, महेद्र.मोडासे, राहुल मंगरुळे, विजय टाकणे,सचिन डोंबे,जयंत राऊत आदींनी मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांना निवेदन देवून म्हसवडच्या व्यवसाईकावर अन्याय होत आहे असल्याने उद्या मंगळवारी म्हसवडकर ‌नागरीकांच्या वतीने पालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदन देवून आमची मागणी प्रांताधिकारी साहेब यांचे पर्यंत पोहचवा व उद्या पासून दुकाने उघडण्यास बंदी केल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले.