फुले वार्ड येथील गांजा विक्रेत्यावर पोलिसांची धाड़

28

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.9जून):-शहरात अवैध दारुसह आता अंमली पदार्थाचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या अंमली पदार्थाचा छुपा व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांवर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड़ घालून तब्बल ४.७३० किलोग्रॅम गांजा हस्तगत करीत आरोपीला अटक केली.
सदर अंमली पदार्थ(गांजा) ७० हजार ९५० रूपये किंमतीचा असून या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले वार्ड येथील विजय उर्फ बावा माणिक कोथरे(४०) या आरोपीस काल दि.८ रोजी अटक केली असून मुख्य फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
सदर कारवाई एन.डी.पी.एस.कायद्यान्वये करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपीचे निवासस्थानी एका प्लास्टीक पोत्यामध्ये ४.७३० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.

सदरचा गांजा हा फुले वार्ड येथील फरार आरोपी राकेश सिद्धार्थ जनबंधु याचा असल्याचे अटकेतील आरोपी बावा याने सांगितले.सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अपराध क्रमांक ५०५/२०२२ कलम २० (ब) २९ एन.डी.पी.एस.कायदयान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि प्रशांत पाटणकर हे करीत आहे.सदरची कामगीरी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विरेन्द्र कांबळे, संदिप बदकी यांनी केली आहे.