गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या एका इसमास अटक

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.10जून):ल:- गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या एका गुन्हेगाराला सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक गावठी व तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत गुन्हेगारांनी कोणाकडून कट्टा व काडतुसे खरेदी केली तो कट्टा कुठे घेऊन जात होता याचा पोलीस तपास करत आहे त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे दिपक प्रकाश जगताप वय 36 राहणार मिलन लाईन कॉटर रोड देवळाली कॅम्प असे अटक करण्यात आलेल्या चे नाव आहे पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार बुधवारी रात्री गस्त घालत होते.

रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान एक संशयित दुचाकीवरून गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पवार यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशय दुचाकी चालकास जलतरण सिग्नल ते ताब्यात घेतले पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी व जिवंत तीन काडतुसे आढळून आली त्याच्याकडे विनापरवाना शस्त्र आढळून आल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहे