खेरडा प्रकरणातील जातीवादी समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी- शहराध्यक्ष बाबा मस्के

25

🔸वंचित बहुजन आघाडी केज च्या वतीने तहसिलदार यांना निवेदन सादर

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभाग प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.10जून):-दिनांक 6जून रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील खेरडा या गावात दोन जातीयवादी समाजकंटकांनी बौद्ध वस्तीत मध्ये दारू पिऊन गावातील बौद्ध समाजातील बांधवांना आणि भगिनींना जातीयवाचक शिवीगाळ करीत अवमान केला या प्रकरणी आज तहसील कार्यालय, केज येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत , मोक्का अंतर्गत , रा.सु.का अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि हे प्रकरण जलदगती न्यायालय मध्ये चालवून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे.

या मागणीचे निवेदन आज आज दिनांक 9 जून 2021 रोजी वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष बाबा मस्के यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार मा. धस यांना देण्यात आले..यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मा. बाबासाहेब विठ्ठल मस्के,तालुका सचिव मा. उत्तम अप्पा वाघमारे,तालुका सचिव मा नवनाथ पौळ, तालुका संघटक मा विशाल भैया धिरे,उपस्थित होते.