प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

25

🔹शाश्वत यौगिक शेती काळाची गरज: स्नेहा गिरी

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.10जून):-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष संवर्धन आणि संगोपन उद्दिष्टाने पुईखडी येथे ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय’ कोल्हापूर मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.वृक्ष लागवडीचे महत्त्व, त्यांचे संगोपन,जोपासना यासाठी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ग्रामविकास प्रभागप्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा बहन यांनी आपल्या प्रभावशाली वक्तव्यातून झाडांनाही परमात्माकडून मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याचबरोबर शांती, प्रेम, सुख, आनंद यांच्या असीम ऊर्जेची गरज असते, हे स्पष्ट करत राजयोगा मेडिटेशन द्वारे झाडे, वेलिंशी एकरूप होऊन योग करून घेतला. या अशा शुभभावना,शुभकामना, दिव्य आणि शक्तिशाली लहरींमध्ये आपल्या प्रत्येकाचा महत्वपूर्ण सहभाग कसा असतो हे स्पष्ट केले.

अशा या प्रदीर्घ व्यासंगामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहा गिरी(शहर वाहतूक पोलीस निरीक्षक),वसंतराव दादा देशमुख(संस्थापक- देशमुख हायस्कूल ),अॅड. गुंडा पाटील, सुरेश राठोड( समन्वयक- सरपंच सेवा संघ) यांची उपस्थिती मोलाची ठरली.यानंतर शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी म्हणाल्या, आज या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची एनर्जी जाणवत आहे. ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त शाश्वत यो यौगिक शेती कशा पद्धतीने केली जाते हे कळाले. त्याचबरोबर प्रत्येकाने अशा प्रकारची शेती व वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.

यानंतर वसंतराव देशमुख म्हणाले मी एक शाळा चालवतो. त्यामध्येही ब्रह्माकुमारीचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर मी टिंबर असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने झाडे लावणे हे आमचे कर्तव्य आहे; लगबग चार एकर जमिनीमध्ये मी वृक्षारोपण केले आहे. या सर्वांमध्ये मला ब्रह्माकुमारी चे मोठे योगदान लाभले आहे. यामुळे शक्य तितकी मदत माझ्याकडून भविष्यात येथील यौगिक शेतीला व वृक्षांना देताना मला आनंद होईल असे मत देशमुख यांनी व्यक्त केले.यावेळी हेडकॉन्स्टेबल शशिकांत पोरे (शहर वाहतूक पोलीस क्राईम विभाग ), संदीप मिठारी (सामाजिक कार्यकर्ते), ब्रह्मा कुमारी संजीवनीदिदीजी, मनीषाबहनजी, शारदादिदीजी, स्वरूपादिदीजी, राजेश्वरीबहनजी, ब्रह्माकुमार सुभाषभाईजी, परेशभाईजी आदी उपस्थित होते.