शासकीय रक्तपेढी मध्ये एकनिष्ठानी दिले रक्तदाते

48

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

खामगाव(दि.11जून):-खामगांव येथील शासकीय रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी विष्णु मुंडे यांनी काल दिनांक १० जून रोजी आवाहन केले होते सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णाचे जीव धोक्यात आलेले आहे जर वेळेवर रक्त नाही मिळाले तर त्यांना जीव गमवायची वेळ येऊ शकते. विष्णु मुंडे यांचा वाढदिवस १० जून रोजी असल्याने त्यांनी आपला वाढदिवशी थैलीसीमिया रुग्णाला रक्तदान केला. यावेळी एकनिष्ठा फाउंडेशनच्या १४ रक्तनायकांनी शासकीय रक्तपेढी मध्ये गरजुला रक्तदान करून विष्णु मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दीक एकनिष्ठा शुभेच्छा दिल्या या शिविरात एकूण १५ लोकांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिविरात विष्णु मुंडे, कुंदन यादव, मोहन शर्मा, निलेश अमृतकर, किरण बावस्कर, अनंता राठोड, विजय डाबेराव, चेतन व्यास, अंकुश बहुरूपे, परमेश्वर शेले, योगेश नागे, राजेश कवडे, नागेश सिंघन, गणेश सावरकर, आदिनीं रक्तदान केले या शिविरात सुरजभैय्या यादव, विष्णु हटकर, दत्ता जाधव, प्रशांत राऊत, बालचंद चव्हाण, गणेश थोरात सामान्य रुग्णालयाचे श्री.वाघमोडे, पवार, शेळके, रक्तपेढीचे सौ.देशमुख, सौ.देशपांडे, कु. माहोदे आदि लोकांची उपस्थिती होती अशी माहिती विष्णु हटकर यांनी दिली.