पेट्रोल, डिझेल,गँस, विजबिल महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे “इंधन वाहन धक्का मारो” आंदोलन

24

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जून):-केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस व महागाई धोरणाच्या विरोधात व वीज बिल माफ करा यासाठी आज संपूर्ण राज्यभर 36 जिल्ह्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर धक्का मारो आंदोलन करण्यात आले. महागाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोटर सायकलला धक्का मारत शिवभीम चौक ते तहसील कार्यालयापर्यंत धक्का मारो आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या हातातून रोजगार हिरावला गेला आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि त्यातच खाद्यतेल पेट्रोल डिझेल गॅस याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे सोबतच घरगुती विज बिल मोठ्या प्रमाणात आले रोजगार नसल्याने वीज बिल भरायचे कुठून असा प्रश्न सामान्य जनते समोर उभा राहिला आहे.

वाढती महागाई कमी करावी पेट्रोल-डिझेल गॅसचे भाव कमी करून वीज बिल माफ करावे यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने महागाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे उमरखेड विधानसभा प्रभारी किशोर नगारे, हिंगोली लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर, प्रमोद जाधव, समाधान पंडागळे, रमेश नलावडे, रमेश कांबळे, महेश कामारकर, राहुल गायकवाड, संतोष ढगे ,विनोद बनसोडे, बाबू जाधव, शंकर भगत, रमेश गोरे, जयशिल कांबळे, ऋषभ हटकर, ढोणे माळकिनीकर पदाधिकारी उपस्थित होते.