भरधाव कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

41

🔹गेवराई तालुक्यातील गढी जवळील वडगाव फाटा येथील घटना

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:- 9075913114

गेवराई प्रतिनिधी :- दुचाकीवरील दोघांना कारने जोराची धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गढी जवळील वडगाव फाट्यावर बुधवारी ६ वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन महादेव शेद्रे ( ४५ ) असे मृताचे नाव आहे . गंभीर जखमी असलेले बाबासाहेब नामदेव शिंदे ( ३३ ) यांना अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अर्जुन महादेव शेद्रे आणि बाबासाहेब नामदेव शिंदे हे दुचाकीवरून ( ए.एच 23 सी.एल 9890 ) गेवराईहून रानाज्नी या गावी जात होते. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बीडहून येणाऱ्या भरधाव कारने ( ए.एच 23 ए.डी 4618 ) गढी जवळील वडगाव फाट्यावर त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली.