🔹प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या खणखणीत इशारा

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.18जून):- गटविकास अधिकारी जिवती यांना आतापर्यंत अनेक तक्रारी देऊन सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आता कोरोना आहे म्हणुन घरी बसायचं का ? शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. चिखली खुर्द अंतर्गत पाटागुडा गावात ग्रंथालयाच काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकमाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची.

गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य विनियोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत चिखली खुर्द येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे यांनी दिली आहे…

ग्रा पं चिखली खुर्द अंतर्गत चार गावे येतात चिखली,पाटागुडा,कामतगुडा,पालडोह या चारही गावात विविध योजनेतून काम होत आहे. विकासकामामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण ग्रामसेवक,सरपंच, ठोकेदार,व इंजिनियर, यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ग्रामसेवक सरपंच, इंजिनियर, हे अधिकारी ठोकेदार कडून पैसे घेऊन गावातील कामे निकृष्ट दर्जाचे करीत आहे, यामुळे गाव विकासालाही खिळ बसली आहे, असे चित्र ग्रामपंचायत चिखली खुर्द येथे दिसत आहे. चिखली खुर्द ग्रामपंचायत कडे प्रशासकीय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे अशा आरोप सुध्दा जिवन तोगरे प्रहार रुग्णसेवक यांनी केले आहे

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED