वास्तव जीवनाचे

31

✒️लेखक:-संदीप गायकवाड(९६३७३५७४००)

रात्रीचे अकरा वाजले होते.सारे रस्ते सामसूम झाले होते.काही ठिकाणी शेकोटी करून थंडीला घालवायला मानवी घोळके शरीराला उब देत होते.कोरोनाचा काळ असल्याने अनेकांनी मास्क लावला होता तर काहीनी मास्क लावला नव्हता.आकाशातील निरभ्रता गुलाबी थंडीला उत्तेजना देत होती.गंधवाहाची झुळूक लवणाला व मनाला मधुरमिलनाची आस दाखवत होती.नागपूर शहर प्रकाशमान झाले होते.रस्त्यावरील लाईटावर रातकिड्यांनी गर्दी केली होती.

मी बर्डीवरचे काम करून घराकडे प्रस्थान करत होतो.स्वेटर नसल्याने थंडी अंगाला झोंबत होती.काही माणसे रस्त्यावर आपले अस्तित्व शोधत होते.गांज्या पिणाऱ्या टोळक्यांनी हुज्जत घातली होती.दोन मीत्र आपसात भांडत होती.निरव शांतता असल्याने आवाजाची तिव्रता खूप दूर पर्यंत जात होती.या कलहाकडे डोळेझाक करून आपला मार्ग प्रस्थ करीत होते.

काही कुटूंब शहरातील उड्डाणपूलाखाली व रस्त्याच्याकडेला आपले जीवन कुंटीत होते.काही कुटूंब झोपण्याच्या तयारीत होते.बोचरी थंडी माणसाला हैरान करीत होती.जीवनाची करून कहाणी संपत नव्हती.लॉकडाऊनने त्याचे आयुष्य उध्दवस्त करून टाकले होते.जीवनाच्या वाटेला आलेले अगणित दुःख नष्ट होत नव्हते.जमीनीला आई व आकाशाला बाप मानून जीवनाची लढाई सुरू होती.काही माणसे मोबाईलवर रमीचा डाव खेळण्यात गुंग होते.बायांनी घोळका करून टाईमपास म्हणून पत्त्याचा डाव टाकला होता.चिल्लेपील्ले झोपी गेली होती.जवळच्या श्वानाच्या केकटण्याने ते घाबरून उठली होती.एकाने माणसाने दगड भिरकवला श्वान दूर पळाले.
थंडीच्या गारव्याने मनाला नवी उभारी आणली होती.निसर्गातील तिन्ही ऋतू परिवर्तन घेऊन येतात.पण भटक्या ,विमुक्त , वंचित मानवाला परिवर्तन माहित नाही.आकाशाखाली जन्म घेऊन अंधाऱ्या काळात आयुष्य गडप होत होते.वयात न आलेल्या कळ्यांना यातनामय जीवन झेलावं लागतं.स्वच्छतेचे सारे नियम मोडले जातात.योग्य व पुरक आहार मिळत नाही.स्वच्छ पाणी ,अन्न,पोषाख,निवारा मिळत नाही. आलेलं जीवन रेटत जाणं एवढचं त्यांना ठाऊक .काही समाजदार आईला व बाबांना मुलांनी शिकावं असं वाटत पण पोटाची कळगी भरता भरता जीव कासाविस होत असतो.हा भटका प्रवास कधी थांबेल याचा नेम नाही.

लोकशाहीला सत्तर वर्ष होऊनही काही समाजघटकाला जाणुनबूजुन माणसापासून तोडण्याचे कटकारस्थान होत आहेत.व्यवस्थापरिवर्तनाचे खोटे आश्वासन देऊन त्यांची बोळवन केली जाते.नशापाण्यात धुंद ठेवून वाईट काम करून घेतले जातात.भारताच्या प्रमुख मोठ्या शहरातील असे जत्तेच्या जत्ते उड्डाणपूलाखाली आयुष्य वेचित आहेत .पण कोणत्याही सरकारला त्याचे प्रश्न हाताळता आले नाही.कारण हा वर्ग भटकत असल्याने निवडणूकित प्रभाव पाडू शकत नाही ही भूमिका सरकारची असल्याने ते या वर्गाला नसीबावर सोडून देतात.शिक्षणाच्या अभावाने तो क्रांती करत नाही.योग्य औषधोपचार नसल्याने गर्भातच कितीतरी अंकुर मरण पावतात.
जडीबुट्टीचा तडका देऊन कन्हतंकन्हतं घालणाऱ्या या भारतीय माणसाला लोकशाहीने काय दिले ?
ना घर ना घाट, तर काही लोकांना गडगंज संपत्ती .ज्याच्याकडे खाणे पिणे,एेसोआरामची चंगळ.

ही अभावग्रस्त माणसे भारताचे लोक नाहीत का ?
शहराला भयावह गुन्हेगारीचे अड्डेतर तयार करीत नाही ना. ..!आता वंचितानो,भटक्याविमुक्तांनो असं असफल जीवन जगण्यापेक्षा आपला आवाज बुलंद केला पाहिजे.सरकारला आपला आर्थिक , सामाजिक,राजकिय,शैक्षणिक संविधानीक वाटा लढवून मीळवला पाहिजे.जिल्हाधिकारी ,महापौर,पालकमंत्री यांनी यांची बाजू समजून घेऊन नवा रोडमँप तयार करून, निवारा केंद्र तयार करून त्याच्या मुलांची सर्व काळजी घ्यायला हवी.आधुनिक भारताचे भविष्य मातीमोल होण्यापासून वाचवायला हवे.वाईट संगतीतून होणारे अतिप्रसंग टाळण्यासाठी न्यायालयाने स्वतः सज्ञान घेऊन शासनाला दिशादर्शक धोरण करायला बाध्य करावे.
आपल्या देशातील सर्व नागरिकांच्या जीवनाची काळजी घेणे ही सरकारची सैंवधानिक कर्तव्य आहे.वास्तव जीवनाचे भयावह संकट समाप्त करण्यासाठी सर्व समाजातील लोकांनी मदत करावी .तरच अभावग्रस्त समाजाला लोकशाहीचा क्रांतीसूर्य मिळाला असे वाटेल.