रणमोचन किन्ही रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करा

29

🔹रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्तीची मागणी़ं

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.18जून):-ब्रह्मपुरी तालुक्यातील
रनमोचन -किन्ही मार्गाचे काही वर्षाच्या अगोदर खडीकरण झाले होते या मार्गाचे 300 ते 400 मीटर रस्ता डांबरीकरण झालेला आहे तर जवळपास अर्धा रस्ता म्हणजे दोनशे ते तीनशे मीटर रस्ता खडीकरण बाकी असून त्या रस्त्यावर डांबरीकरण करावे अशी मागणी रनमोचन व किन्ही येथील नागरिकांनी केली आहे.

सदर खडीकरण झालेला रस्ता पूर्णतः ऊखडलेला असून त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपांनी वेढलेला असल्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या सायकल मोटर सायकल चालवणाऱ्या व्यक्तींना याचा फार मोठा त्रास होत आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत आहे.

शिवाय या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्या खड्ड्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी साचलेला असतोत्यामुळे ये-जा करणार्‍या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे,सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सोडून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे